Share

भाजप नौटंकीबाज, युपीची निवडणूक लढण्यास काँग्रेस तयार-नाना पटोले

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : देशातील पाच राज्यांमध्ये निवडणुकांची लवकरच घोषणा होणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. पाच राज्यांची निवडणूक जिंकण्यासाठी काँग्रेसने केलेल्या तयारीबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उत्तर प्रदेश तसेच इतर राज्यांची निवडणूक जिंकण्यासाठी काँग्रेस तयार आहे. या निवडणुकीत परिवर्तनाची लहर दिसेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

पुढे बोलताना पटोले म्हणाले, केंद्रात भाजपचे सरकार आहे. त्यामुळे ते कोणाच्याही विरोधात ईडी, सीबीआय लावू शकतात. आम्ही लोकशाहीला मानतो. आम्ही आमच्या पद्धतीने उत्तर देऊ. उत्तर प्रदेशच्या निवडणुकीसाठी काँग्रेस पूर्ण ताकदीने तयार आहे. परिवर्तनाची लहर आली आहे. मूळ मुद्द्याला बाजूला सारण्यासाठी नौटंकी केली जात आहे. हे लोकांच्या लक्षात आलं आहे. महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे मुद्दामहून दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न सुरु आहे. देशातील लोकांना भाजप नौटंकीबाज आहे, हे समजलं आहे. या निवडणुकीत परिवर्तन झालेले पाहायला मिळेल.

पुढे निवडणूक आयोगावर निशाणा साधत पटोले म्हणाले, निवडणूक आयोग कोणाचं आहे हे आता स्पष्ट झालं आहे. राज्यामध्ये नगर पंचायतीच्या निवडणुका तसेच भंडारा जिल्हा परिषदेच्या निवडणुका होऊ घातल्या होता. त्यामध्ये राज्य सरकारने ओबीसी आरक्षण आणि कोरोनाची स्थिती हे सगळं व्यवस्थित झाल्यानंतरच निवडणुका घ्याव्यात अशी मागणी राज्य सरकारने निवडणूक आयोगाला केली होती. त्यामुळे आता निवडणूक आयोग कोणाच्या इशाऱ्यावर काम करतो यावर चर्चा करणं गरजेचं आहे. असेही पटोले म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!