Share

टक्कलपण आणि केस गळती बनला दक्षिण कोरियाचा निवडणूक मुद्दा; नेमके प्रकरण काय?

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली: केस गळती आणि टक्कलपण ही समस्या असणारे जगात अनेक लोक आहेत. या समस्येवर अनेक तेल उत्पादने अनेक दावा करतात. मात्र केस गळण्याचे दुःख ते त्यांनाच माहिती असते. किंवा टक्कलपण मुळे बऱ्याच जणांना अनेक्क समस्यांनाही तोंड द्यावे लागते. मात्र अशा व्यक्तींचा राष्ट्रीय राजकारणात आजपर्यंत कुठेही विचार केला गेला नाही. मात्र दक्षिण कोरिया (South Korea) याला अपवाद ठरला आहे.

दक्षिण कोरोयात राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत केस गळती आणि टक्कलपण हा महत्वाचा निवडणूक मुद्दा बनला आहे. या निवडणुकीतील उमेदवार ली जे म्युंग (Lee J. Myung) यांनी केस गळती रोखण्यासाठी ठोस पाऊले उचलण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. तसेच निवडून आल्यास केस गळतीवरील उपचार राष्ट्रीय आरोग्य विमा अंतर्गत समाविष्ट करणार असल्याचा दावाही ली जे म्युंग यांनी केला आहे.

दक्षिण कोरिया म्हटल की, अनुसज्जता, अमेरिकेसोबतचे संबंध,उत्तर कोरिया सोबत असलेले वाद असे अनेक मुद्दे समोर येतात. मात्र यंदा केस गळती आणि डोक्यावरील टक्कल हे निवडणुकीतील महत्वाचे मुद्दे बनले आहेत. आणि या मुद्याला आता दक्षिण कोरियामधील नागरिकांनीही पाठींबा दिल्याचे दिसून येत आहे. जगातील ७० टक्के लोक टक्कलपणामुळे ग्रस्त आहेत. मात्र ही समस्या इतकी गंभीर घेणारे दक्षिण कोरोया हे जगातील पहिला देश ठरणार आहे. आणि निवडणुकीत हा अनोखा मुद्दा मांडणारे ली जे म्युंग हे पहिले उमेदवार ठरले आहेत.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!