Share

‘एसटी कर्मचाऱ्यांच्या सहनशक्तीचा अंत बघणाऱ्या मुर्दाड सरकारचा तीव्र निषेध’, भातखळकरांचा हल्लाबोल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांनी दिवाळीपूर्वीपासून एसटीचे विलीनीकरण या प्रमुख मागणीसाठी संप पुकारला आहे. तो अद्यापही सुरुच आहे. काही दिवसांपूर्वी कर्मचाऱ्यांना वेतनात ४१ टक्के वाढ दिली, विलीनीकरणासाठी समितीही नेमण्यात आली. तरीही एसटी कर्मचाऱ्यांनी लाखो प्रवाशांना वेठीस धरून संप सुरूच ठेवला आहे. राज्य सरकारने संप मिटल्याची घोषणा केली असली तरी अद्याप काही कर्मचारी कामावर परतलेले नाहीत. त्यामुळे आता एसटी महामंडळाने कामावर न येणाऱ्या ५५ हजार कर्मचाऱ्यांना नोटीस पाठवली आहे. असे असतांनाच सोलापुरात परिवहन मंत्र्यांच्या फोटोला रक्ताचा अभिषेक करत संतप्त एसटी कर्मचाऱ्यांनी राग व्यक्त केला.

याच मुद्द्यावरून आता भाजप नेते अतुल भातखळकर(Atul Bhatkhalkar) यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे. यासंदर्भात भातखळकरांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,’सोलापुरात परिवहन मंत्र्यांच्या फोटोला रक्ताचा अभिषेक करत संतप्त एसटी कर्मचाऱ्यांनी राग व्यक्त केला आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या तीव्र भावना लक्षात न घेता त्यांच्या सहनशक्तीचा अंत बघणाऱ्या मुर्दाड सरकारचा तीव्र निषेध.’ तसेच ठाकरे सरकार होश में आओ, असे भातखळकर म्हणाले आहेत.

दरम्यान, सोलापूर आगारात राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब दौऱ्यावर असतांना एसटी कर्मचाऱ्यांनी परिवहन मंत्र्यांचा निषेध केला आहे. तसेच यापैकी एका एसटी कर्मचाऱ्याने तर हाताचा बोट कापत परिवहन मंत्र्यांच्या फोटोला रक्ताचा अभिषेक घातला आहे. यावेळी एसटी कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!