🕒 1 min read
मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांच्या विरोधात भाजपच्या जितेन गजारीय (Jiten Gajaria) यांनी वादग्रस्त ट्विट केल्या प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधातही आक्षेपार्ह ट्विट केल्या प्रकरणी भाजपचे माजी नगरसेवक संदीप म्हात्रे याला अटक करण्यात आली. या प्रकरणावरून विरोधकांनी महाविकास आघाडी सरकारवर तसेच शिवसेनेवर चांगलाच निशाणा साधण्याचा प्रयत्न केला आहे.
भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी देखील शिवसेनेवर टीका केली आहे. तसेच जितेन गजारिया यांनी केलेले ट्विट हे चुकीचेच असल्याचेही त्या म्हणाल्या आहेत. मात्र, महिला खासदारांवर शिवसेनामंत्री गुलाबराव पाटलानी केलेलं वक्तव्य आक्षेपार्ह नव्हतं? शिवसेना खासदार सर्वज्ञानींनी भाजप नेत्यांना प्रसिद्धीमाध्यमांसमोर केलेली शिवीगाळ आक्षेपार्ह नव्हती? असा सवाल चित्रा वाघ यांनी उपस्थित केला होता. तसेच आज चित्रा वाघ यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांना पत्र देखील पाठवले आहे.
मा. गृहमंत्री साहेब…
पत्रास कारण की… अनेकदा आपल्याला आठवण करून दिली तरी संजयजी राऊत आणि गुलाबराव पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही..
विधानसभा अध्यक्षपदी असताना आपण हेडमास्तर’ सारखी भूमिका बजावली पण गृहमंत्री झाल्यावर तो दरारा कुठे गेला? हेडमास्तर कुठे हरवले आहेत ? pic.twitter.com/8CTFiqAJpi— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) January 7, 2022
भाजप नेत्या चित्रा वाघ पत्रातून म्हणतात की, अनेकदा आपल्याला आठवण करून दिली तरी संजयजी राऊत आणि गुलाबराव पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही, विधानसभा अध्यक्षपदी असताना आपण हेडमास्तर’ सारखी भूमिका बजावली पण गृहमंत्री झाल्यावर तो दरारा कुठे गेला? हेडमास्तर कुठे हरवले आहेत, असा प्रश्न त्यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना पत्रातून विचारला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- सुनावणी होईपर्यंत कर्मचाऱ्यांनी ठाम राहावे, सुनावणी रद्द झाल्यानंतर सदावर्तेंचे आवाहन
- ‘सरकारला एसटी कर्मचाऱ्यांची कसलीच पर्वा राहिली नाही’; चंद्रकांत पाटलांची टीका
- “मुख्यमंत्री कोरोनाच्या छाताडावर चढून त्याचा कोथळा काढणार की…”; अतुल भातखळकरांची बोचरी टीका
- मित्र आर्यन खानला भेटण्यासाठी अरबाज मर्चंट करणार न्यायालयात अर्ज ; जाणून घ्या कारण
- “…तर माझा हात पाहा आणि सांगा”, मुख्यमंत्री पदाबाबत राणेंचे मोठे भाष्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
