Share

पंजाबने भाजपच्या अहंकाराला आरसा दाखवला; काँग्रेसचे भाजपला प्रत्युत्तर

Published On: 

🕒 1 min read

चंदीगड: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) पंजाब दौऱ्यावेळी त्यांचा ताफा निदर्शकांनी तब्बल १५ ते २० मिनीटे अडवल्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव पंतप्रधांनांना आपला दौरा रद्द करावा लागला. त्यामुळे आता यावरून भाजपने कॉंग्रेसवर टीका करायला सुरुवात केली आहे. मात्र आता भाजपच्या टीकेला कॉंग्रेसने देखील प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे.

पंजाबमध्ये झालेल्या या घटनेमुळे आता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (J P Nadda) यांनी पंजाब सरकारला यावरुन जाब विचारल्यानंतर त्याला काँग्रेसने उत्तर दिलं आहे. पंतप्रधानांचा दौरा रद्द करण्यामागे निदर्शकांचे कारण नसून मोदींच्या सभेतील मोकळ्या खुर्च्या आहेत असा टोला काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला (Randeep Surjewal) यांनी लगावला आहे.

कॉंग्रेस प्रवक्ते प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले की, या दौऱ्यासाठी सर्व व्यवस्था काटेकोरपणे करण्यात आली होती. पण पंतप्रधानांनी त्यांच्या दौऱ्यातील मार्गामध्ये बदल केला. पंतप्रधानांचा ताफा अडवला ते निदर्शक किसान मजदूर संघर्ष कमिटीचे होते. शेवटी पंतप्रधानांची ही रॅली रद्द करण्यामागे हे निदर्शकांचं कारण नव्हते तर त्यांच्या सभेसाठी गर्दी न जमणे, खुर्च्या रिकाम्या असणे हे आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केला आहे. तसेच पंजाबने भाजपच्या अहंकारला आरसा दाखवला असल्याची खोचक टीका त्यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!