🕒 1 min read
मुंबई : भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश कार्यकारिणी बैठकीला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी संबोधित केले. यावेळी त्यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. नवीन विद्यापीठ विधेयकावरून फडणवीसांनी ठाकरे सरकारचा चांगलाच समाचार घेतला. “आता सगळ्या प्रकारचे शैक्षणिक आणि प्रशासकीय अधिकार मंत्र्यांनी घेतले आहेत. महाविकास आघाडी सरकारने आणलेला विद्यापीठ कायदा काळा आहे. त्यावर एक व्यक्ती विद्यापीठाचा, एक राज्यपालाचा आणि तीन व्यक्ती सरकारचे असतील. त्यामुळे या कायद्यामुळे राज्यपालही कटपुतळी बनतील,” असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “येणाऱ्या काळात कुलगुरुंच्या पदाचा लिलाव झाल्याशिवाय राहणार नाही. शिक्षणाचे पवित्र स्थान असलेल्या विद्यापीठ अपवित्र करण्याचे काम या सरकारच्या माध्यमातून होणार आहे. एवढेच नाही तर विद्यापीठातील सर्व नेमणुका सरकारने आपल्या हाती घेतल्या आहेत. उद्या चालून नेमणुकीच्या जागी युवासेनेचे लोक आपल्याला त्या ठिकाणी दिसतील आणि विद्यापीठ हे युवासेनेचे अड्डे बनवण्याचं षडयंत्र या सरकारच्या माध्यमातून झालं आहे.
महाराष्ट्रातील युवकांना बरबाद करणारा हा विद्यापीठ कायदा आहे. मला रात्री झोप येत नाही, मला चिंता आहे की अशा प्रकारचे कायदे होत राहीले तर माझ्या पुढच्या पिढीच काय होईल. त्यामुळे जोपर्यंत हा कायदा परत होत नाही तोपर्यंत लढाई करा, असे आव्हान देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय जनता युवा मोर्चाला केले आहे.
उदय सामंतांना खोचक टोला
“२०१६ साली जे विधेयक आपण पास केलं होत. देशातील, राज्यातील शिक्षणतज्ञांनी एकत्र येऊन त्याचा मसुदा तयार केला त्यानंतर यावर आपण संयुक्त निवड समिती तयार केली यामध्ये सर्व पक्षाचे नेते होते. त्यानंतर तो कायदा तयार केला. त्या कायद्याला संपवण्याचे काम हे सरकार करत आहे. सरकारने आणलेल्या नवीन विधेयकात उपकुलपतीची तरतुद केली आहे. उपकुलपती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री (उदय सामंत) आहेत. मी त्यांना सांगितले की जेव्हा पदवीदान समारंभ होतो. त्यावेळी ते आपल्याला गाऊन, हॅट घालतात बर वाटत. पण तुम्ही उपकुलपती न होता शिक्षणमंत्री म्हणून तिथं गेलात तरी तुम्हाला गाऊन घालायला मिळाणार आहे. तुमच्या गाऊन घालण्याच्या हट्टापायी उपकुलपतीचे पद तयार करुन आमच्या तरुणांना वेठीस धरण्याचं कारण काय आहे?”, असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला.
महत्वाच्या बातम्या –
- “तुमच्या गाऊन घालण्याच्या हट्टापायी…”; फडणवीसांचा उदय सामंतांना खोचक टोला
- महाराष्ट्रातून भाजप कार्यकर्ते उत्तर प्रदेशात प्रचारासाठी जाणार- देवेंद्र फडणवीस
- “मला मारलं बिरलं तर लफडं व्हायचं म्हणून..” भाजप आंदोलनानंतर आव्हाडांची प्रतिक्रिया
- “मुख्यमंत्री खुर्चीवर नसताना राज्य व्यवस्थित सुरु, याचं श्रेय राज्यपालांना…”, रावसाहेब दानवेंचा टोला
- राष्ट्रवादीचे नियोजित सर्व कार्यक्रम रद्द; बैठकीनंतर नवाब मलिकांची माहिती
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
