🕒 1 min read
मुंबई : बाळ धनंजय… माईने समाजाला खूप दिलं, पण सरकार म्हणून माईच्या संस्थेला काहीतरी देण्याचा पहिला मान तुझाच रे…! असं म्हणून माझ्या कार्याची अभिनव पोहोच पावती देणाऱ्या अनाथांची माई, पद्मश्री सिंधूताई सपकाळ यांच्या निधनाने आपण व्यथित झालो आहोत, अशी प्रतिक्रिया सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली आहे.
'बाळ धनंजय, माईने समाजाला खूप दिलं, पण माईच्या संस्थेला सरकार म्हणून काहीतरी देणारा तूच रे पहिला…असं म्हणून माझ्या कार्याला अभिनव पोहोच पावती देणारी अनाथांची माय, पद्मश्री सिंधूताई सपकाळ यांच्या निधनाचे वृत्त व्यथित करणारे आहे. निस्वार्थ समाजसेवा या शब्दाचा समानार्थी शब्द माई! pic.twitter.com/rpNiDBDR8S
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) January 4, 2022
अनाथांसाठी सेवाकार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांचे पुण्यात ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्या ७४ वर्षांच्या होत्या. मंगळवारी रात्री ८ वाजून १० मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पुण्यातील गॅलक्झी हॉस्पिटलमध्ये त्यांचे निधन झाले. महिनाभरापूर्वी त्यांचे हर्नियाचे ऑपरेशन झाले होते.
ज्येष्ठ समाजसेविका पद्मश्री सिंधूताई सकपाळ यांच्या आयुष्यातील खडतर प्रवास व अनाथांच्या प्रति त्यांचे महान कार्य याचीच प्रचिती म्हणून केंद्र सरकारने माईंना पद्मश्री पुरस्काराने नुकतेच सन्मानित केले होते. राज्य सरकारच्या वतीने पद्मश्री पुरस्कार सुचवणाऱ्या शासकीय समितीचेही धनंजय मुंडे सदस्य आहेत.
दरम्यान सामाजिक न्याय विभागामार्फत अनुदानित संस्थांच्या माध्यमातून चालवल्या जाणाऱ्या वस्तीगृहांपैकी एक बंद अवस्थेतील वसतिगृह धनंजय मुंडे यांनी माईंच्या दि मदर ग्लोबल फाऊंडेशन या संस्थेला हस्तांतरित करून दिले होते.
त्यावेळी माईंनी, ‘या माईने समाजाला खूप काही दिले, पण सरकार म्हणून माईच्या संस्थेला शासकीय निधी देण्याचा पहिला मान मात्र धनंजयचा!"अशी प्रतिक्रीया दिली होती. तसेच, बाळ धनंजय, तू देखील संघर्षातून वर येऊन माईच्या अनाथ बालकांच्या सेवा कार्यास सरकार म्हणून योगदान दिलेस, मला काहीतरी देण्याचा पहिला मान तुझाच! असे भावनिक उद्गार काढून धनंजय मुंडे यांचे आभार व्यक्त केले होते.
आज माई सिंधूताई सपकाळ यांच्या निधनानंतर धंनजय मुंडे यांनी हीच आठवण जागी करत, निस्वार्थ समाजसेवा या शब्दाला ‘माई’ हा समानार्थी शब्द असल्याचे म्हणत, दीन-दुबळ्यांचे हक्काचे आशास्थान काळाच्या पडद्याआड गेले, अशा भावनिक शब्दात माईंना आदरांजली वाहिली आहे.
महत्वाच्या बातम्या
- अनाथांची माय अनाथ करून गेली…! सिंधुताई सपकाळ यांचे पुण्यात निधन
- सिंधूताई जेव्हा मुख्यमंत्र्यांना प्रोत्साहन देतात, “केवढी आव्हानं रे तुझ्यासमोर लेकरा..”
- वहिनी कतरिना सनी कौशलचा फोटो पाहून झाली फिदा, कमेंट करत म्हणाली…
- मुंबई पाठोपाठ आता पुण्यातील शाळा देखील बंद
- अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या आईला हृदय विकाराचा झटका, रुग्णालयात दाखल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
