🕒 1 min read
मुंबई: ‘अनाथांची माय’ अशी ओळख असलेल्या सिंधुताई सपकाळ (Sindhutai Sapkaal) यांचे काल (४ जानेवारी) रात्री वयाच्या ७४ व्या वर्षी निधन झाले.त्यांच्यावर पुण्यातील गॅलक्सी रूग्णालयात उपचार सुरू होते.पुण्यातील गॅलेक्सी हॉस्पिटल येथे हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे काल निधन झाले. सिंधुताईंच्या निधनानंतर राज्यभरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. मायेने ‘बाळ’ म्हणूनच कुणालाही हाक मारणाऱ्या सर्वांच्या ‘माई’ अनंतात विलीन झाल्या. त्यांची आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray)यांची अशीच एक आठवण आहे, जेव्हा सिंधुताई मुख्यमंत्र्यांना प्रोत्साहन देतात.
कोरोना काळात सिंधुताई यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना फोन करुन प्रोत्साहन दिलं होतं. त्यावेळी या फोन कॉलची चांगलीच चर्चा रंगली होती. ९ एप्रिल २०२० रोजी त्यांच्यात ही चर्चा झाली होती. त्यावेळी सिंधुताई यांनी मुख्यमंत्र्यांना धीर देत प्रोत्साहन दिले होते. “उद्धवा महाराष्ट्र तुझ्या खांद्यावर उभा आहे सगळी जबाबदारी तू उत्तमरित्या पेलतो आहेस” अशी कौतुकाची थाप सिंधुताई यांनी मुख्यमंत्र्यांना दिली होती.
सिंधुताई यांचे ‘ते’ प्रेमळ आणि धीर देणारे शब्द-
बाळासाहेबांच्या पिल्ल्या बोल, या मायेच्या हाकेने संभाषणाची सुरुवात झाली. बाबा केवढी कसोटी आहे लेकरा… केवढी कसोटी आहे..पण त्या कसोटीला धीराने तोंड देतोस तू.. खरंच. बाळासाहेबांचं रक्त..समर्थपणे पुढे चालला आहेस. एवढा सिंपल मुख्यमंत्री, कुठेही बदल नाही तुझ्यात..पावलं उचलताना वाटलं नव्हतं तू एवढा खंबीर होशील म्हणून.जगाची काळजी तुझ्यावर आहे आता. महाराष्ट्र तुझ्या खांद्यावर उभा आहे बाळ तू पण काळजी घे बेटा. हे सगळं निवळल्यावर मी येऊन जाईन बेटा.पण सांभाळ, काळजी घे पिल्ला काळजी घे. मीनाताईचं दूध आहे तुझ्यात काही हरणार नाहीस तू. या प्रेमळ आणि मायेच्या शब्दांनी सिंधुताई यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना प्रोत्साहन दिले होते. आज लाखो जणांच्या कैवारी ‘अनाथांची माय’ अनंतात विलीन झाल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या:
- अनाथांची माय अनाथ करून गेली…! सिंधुताई सपकाळ यांचे पुण्यात निधन
- पुणेकरांनो कोरोनाचे नियम पाळा, अन्यथा…
- वहिनी कतरिना सनी कौशलचा फोटो पाहून झाली फिदा, कमेंट करत म्हणाली…
- मुंबई पाठोपाठ आता पुण्यातील शाळा देखील बंद
- अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या आईला हृदय विकाराचा झटका, रुग्णालयात दाखल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
