Share

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या आईला हृदय विकाराचा झटका, रुग्णालयात दाखल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. मात्र वर्षाच्या सुरुवातीलाच तिला एक मोठा धक्का बसला असून नुकतचं तिच्या आईला हृदय विकाराचा झटका (heart attack) आला आहे. आई किम (mother Kim Fernandez) यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर एक डॉक्टरांची टीम उपचार करत आहे. जॅकलिन लवकर आईला भेटण्यासाठी बहरीनला जाणार असल्याचे म्हटले जात आहे.

दरम्यान काही वर्षांपासून जॅकलिनचे कुटुंबीय बहरीनमध्ये राहत असून जॅकलिन ही एकटी मुंबईत राहते. जॅकलिनची आई किम यांना हृदय विकाराचा झटका आल्यानंतर तातडीने बहरीन येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या डॉक्टर जॅकलिनच्या आईवर उपचार करत असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आले आहे. मात्र जॅकलिनच्या चाहत्यांकडून तिच्या आई विषयी चिंता व्यक्त केली जात आहे.

https://www.instagram.com/p/BxWQih7gFhd/?utm_source=ig_web_copy_link

जॅकलिनच्या आगामी प्रोजेक्टबद्दल बोलायचं झाल्यास लवकरच ‘राम सेतू’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात ती बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारसोबत दिसणार आहे. त्यानंतर ती ‘बच्चन पांडे’ या चित्रपटात काम करताना दिसणार आहे. तसेच ‘सर्कस’ चित्रपटात अक्षय आणि क्रिती सेनॉन यांच्यासोबत झळकणार आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!