Share

औरंगाबाद शहर होणार धूळमुक्त; मनपातर्फे २४ तास कार्यान्वित राहणार ‘ही’ यंत्रणा..!

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद:औरंगाबाद महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण २०२२ च्या अनुषंगाने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. प्रशासक तथा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय(Aastik kumar pandey) यांनी औरंगाबाद महानगरपालिकेतर्फे शहरातील बांधकाम आणि विनाशक कचरा उचलण्यासाठी तात्काळ यंत्रणा कार्यान्वित करणेसाठी आदेश दिले आहेत. यानुसार मनपा यांत्रिकी विभागाच्या वतीने याचे नियोजन करण्यात आले आहे. या पार्श्‍वभूमीवर आता औरंगाबाद शहर धुळमुक्त होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.

शहरात या कामासाठीच्या नगररचना विभागा मार्फत शुल्काचा भरणा करून नवीन इमारत तयार होत असतांना निर्माण झालेले वेस्टेज बांधकाम साहित्य त्याचप्रमाणे अनाधिकृतपणे शहरातील रस्त्याच्या कडेला व अन्य ठिकाणी टाकण्यात आलेले डेब्रिज, रोडारोडी, वेस्टेज बांधकाम साहित्य उचलून नेमून दिलेल्या ठिकाणी टाकण्याचे काम सातत्याने २४ बाय ७ तत्वावर होणार आहे. यासाठी स्वतंत्र कंट्रोल रूम, वाहने, वाहन चालक, वर्कशॉप व पंक्चर युनिट कर्मचाऱ्यांना नियुक्त करण्यात आले आहे.

असे आहे नियोजन

नगररचना विभागामार्फत अधिकृत बांधकाम परवानगी देताना C&D शुल्क भरणा करून प्राप्त होणाऱ्या बांधकाम परवानगीच्या ठिकाणी निर्माण होणारे वेस्टेज बांधकाम साहित्य उचलण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे शहरातील अनधिकृतपणे टाकण्यात आलेले डेब्रिज, रोडारोडी, वेस्टेज बांधकाम साहित्य याबाबत महानगरपालिकेचे इमारत निरीक्षक, स्वछता निरीक्षक, जवान, अथवा शहरातील नागरिक यांच्याकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींची नोंद घेऊन तक्रारींचे ठिकाण, तक्रारदाराचे नाव व मो क्रमांक नोंदवून तक्रार संबंधित वाहन चालक यांच्याकडे वर्ग करण्यात येणार आहे. याकामी नियुक्त वाहनांना निळा व गडद पिवळा असे दोन पट्ट्यात रंग देण्यात येणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!