Share

“रश्मी ठाकरे यांना प्रमुखपद दिले तर…”; अब्दुल सत्तारांच्या ‘त्या’ वक्तव्यावरुन चर्चेला उधाण

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली: भाजप-शिवसेना युतीच्या चर्चा पुन्हा रंगू लागल्या आहेत. शिवसेना नेते आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी युतीचे संकेत दिले असून पुढील निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणार असल्याचे सांगितले. तसेच भाजप- शिवसेना युतीचा पुल फक्त केंद्रीय मंत्री नितीन गडकरी बांधू शकतात, असं देखील सत्तार म्हणाले आहेत. अब्दुल सत्तार सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. यावेळी ते मध्यमांशी बोलत होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आजारी असल्याने विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला ते उपस्थित राहू शकले नव्हते. त्यामुळे विरोधी पक्षाने ठाकरेंवार चांगलीच टीका केली होती. तसेच उद्धव ठाकरे यांचा अन्य नेत्यांवर विश्वास नसेल, तर मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी रश्मी वहिनींकडे द्यावी, अशी खोचक टीका देखील भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली होती.

भाजप नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केलेल्या त्या व्यक्तव्यानंतर शिवसेना नेते व मंत्री अब्दुल सत्तार यांनी मोठे वक्तव्यं केले आहे. अब्दुल सत्तार म्हणाले, रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) मुख्यमंत्रीपद चांगल्या प्रकारे सांभाळू शकतात. त्यांच्याकडे राज्याचे प्रमुखपद दिले तर कोणाचीही हरकत नसेल, असं वक्तव्यं अब्दुल सत्तार यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!