Share

सुनावणीआधी सदावर्तेंचा एसटी कर्मचाऱ्यांना ‘बुस्टर डोस’..!

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद: एसटी कर्मचाऱ्यांच्या दुखवट्यावर बुधवारी (दि.५) सुनावणी होणार आहे. याविषयी पुढील भूमिका ठरवण्यासाठी औरंगाबाद येथील एसटी कर्मचाऱ्यांनी अॅड. गुणरत्न सदावर्ते(Adv. Gunratna Sadavarte) यांची भेट घेतली. यावेळी विजय आपलाच होणार असून कर्मचाऱ्यांनी आपल्या भूमिकेवर ठाम राहा असे आवाहन सदावर्ते यांनी जिल्ह्यातील एसटी कर्मचाऱ्यांना केले आहे. त्याचप्रमाणे बुधवारी होणार्‍या सुनावणीत दुखवट्यात असलेल्या कर्मचाऱ्यांना आमदारांप्रमाणे २ महिन्याचा पगार देण्यात यावा, अशी मागणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

७ नोव्हेंबरपासून एसटी कर्मचाऱ्यांनी संपास सुरुवात केली. आता काही प्रमाणात एसटीच्या फेऱ्या सुरु असल्या तरीही पूर्वीप्रमाणे एसटी कधी धावेल यासाठी प्रवाशांना आणखी प्रतिक्षा करावी लागणार आहे. एसटीचा संप पुकारणाऱ्या संघटनेने मुंबईत संघातून माघार घेतल्याची घोषणा केली असली तरीही राज्यासह मराठवाड्यात अजूनही विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम असलेल्या बहुतांश कर्मचाऱ्यांनी विलीनीकरणाचा हट्ट सोडलेला नाही. औरंगाबादेतील मध्यवर्ती बस स्थानकातील तसेच सिडको बस स्थानकातील कर्मचारी अजूनही आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. आता ५ जानेवारी रोजी होणाऱ्या सुनावणीकडे कर्मचाऱ्यांसह प्रवाशांचे लक्ष लागून आहे. ५ जानेवारी रोजी न्यायालयात होणाऱ्या सुनावणीत कर्मचाऱ्यांची भूमिका मांडण्यात येणार आहे.

राज्यातील ५० हजार कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे इच्छामरणाची परवानगी मागितली आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकार विरोधात याचिका दाखल करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे दुखवट्यात असलेल्या कर्मचार्‍यांना दोन महिन्याचा पगार मिळायला हवा, ज्या कर्मचाऱ्यांचा आत्तापर्यंत कोविडमुळे मृत्यू झालेला आहे त्यांना राज्य सरकार द्वारे मिळणारी ५० लाखांची मदत मिळालेली नाही. ही मदत त्वरित देण्यात यावी यांसह इतर काही मागण्या करण्यात येणार आहेत. मंगळवारी (दि.३) औरंगाबाद विभागात १०४ बसेस धावल्या. २५२ फेऱ्यांद्वारे ३५७१ प्रवाशांनी जिल्ह्यातील जालना, बीड, गेवराई, सिल्लोड, कन्नड आदी ठिकाणी प्रवास केला.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!