Share

औरंगाबादेत सर्वपक्षीय आमदारांची ६०४ कोटींची मागणी; पालकमंत्री मुख्यमंत्र्यांना पोहोचवणार निरोप!

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद: जिल्हा नियोजन समितीने औरंगाबाद जिल्ह्यासाठी २०२१-२२ करिता ३६५ कोटी रुपयांची तरतूद केली. मात्र कोरोनाची तिसरी लाट आली तर सगळा निधी त्यासाठीच खर्च होईल. म्हणून विकासकामांचा विचार करून ६०४ कोटींची मागणी सर्वपक्षीय आमदारांनी सोमवारी झालेल्या बैठकीत केली. ही मागणी शासनापुढे मांडण्याची तयारी पालकमंत्री सुभाष देसाई(Subhash Desai) यांनी दाखवली आहे. औरंगाबाद जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत त्यांनी कोरोना विषयक उपाययोजनांचा, ग्रामीण भागात राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांचा आढावा घेतला.

यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले, कोरोना नियंत्रणासाठी जिल्ह्यात युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. लसीकरणावर विशेष भर देण्यात येत आहे. कोरोना चाचणीदेखील मोठ्याप्रमाणात करण्यात येत आहे. २४४ नमुने जिनोम सिक्वेंन्सिंगसाठी पाठविण्यात आले आहेत. अहवाल अद्याप अप्राप्त आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेचा विचार करता यंत्रणा सक्षम आहे. जिल्ह्यात ३६० रुग्णवाहिका तयार आहेत. ५५२ व्हेंटीलेटर बेड, २१ हजार ३९१ साधे बेड्स सज्ज आहेत.

२५ पीएसए प्लॅन्टच्या माध्यमातून २१ मेट्रीक टन ऑक्सिजन उपलब्ध आहे. कोविडमध्ये जीव गमावलेल्यांना शासन मदत करत असून जिल्ह्यात यासाठी २७२४ एवढे अर्ज प्राप्त झाले असून त्यातील १९४१ अर्ज मंजुर झाले आहेत. उर्वरित अर्जांची छाननी सुरू आहे. यामध्ये औरंगबाद जिल्हा पाचव्या क्रमांकावर आहे असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले. यावेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, रोहयो मंत्री संदीपान भुमरे, जिल्हा परिषद अध्यक्ष मीना शेळके, पोलिस आयुक्त डॉ. निखील गुप्ता, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण तसेच इतर समिती सदस्य बैठकीस उपस्थित होते.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!