🕒 1 min read
मुंबई : म्हाडाच्या (MHADA exam) परीक्षात घोटाळा झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. अखेर या परीक्षांचे नवीन वेळापत्रक जाहीर झाले असून येणाऱ्या २९ जानेवारी ते ३ फेब्रुवारीदरम्यान या परीक्षा होणार आहेत. परंतु २९ जाने. रोजीच एमपीएससीची परीक्षादेखील होणार आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही निराशाजनक बाब आहे. दरम्यान, याच मुद्द्यावरून आता भाजप नेते अतुल भातखळकर(Atul Bhatkhalkar) यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.
यासंदर्भात भातखळकर यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,’पेपर फुटी, परीक्षा रद्दबातल अशी उज्ज्वल परंपरा कायम राखत आता म्हाडा आणि एमपीएससीची एकाच दिवशी परीक्षा घेण्याचा नवीन गोंधळ’, असे भातखळकर म्हणाले आहेत. तसेच अंधेर नगरी घरी बसला राजा, असा खोचला टोलाही यावेळी भातखळकरांनी लगावला आहे.
पेपर फुटी, परीक्षा रद्दबातल अशी उज्ज्वल परंपरा कायम राखत आता म्हाडा आणि एमपीएससीची एकाच दिवशी परीक्षा घेण्याचा नवीन गोंधळ.
अंधेर नगरी घरी बसला राजा. pic.twitter.com/tULI15bMLB— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) January 3, 2022
दरम्यान, एमपीएससीच्या पोलीस निरिक्षक पदासाठी २९ जानेवारी रोजी परीक्षा घेण्यात येणार असून याच दिवशी म्हाडाची लांबवण्यात आलेली परीक्षादेखील घेतली जाईल. या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी घेतल्या जाणार असल्यामुळे आता राज्यातील विद्यार्थी गोंधळात पडले आहेत. दोन्ही परीक्षा एकाच दिवशी होणार असल्यामुळे तारखा जाहीर करताना इतर विभागाचे वेळापत्रक लक्षात घेतले जात नाही, असा आरोपही विद्यार्थ्यांकडून केल्या जात आहे.
महत्वाच्या बातम्या:
- ‘एकमेकाला ओरबाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या समाजाला सावित्रीबाईंनी सत्कार्याचा आदर्श घालून दिला’
- युगायुगांच्या बेड्या तोडणाऱ्या सावित्रीबाई रणरागिणी होत्या- अमोल कोल्हे
- ‘सावित्रीबाईंनी जे कार्य केले,त्याचे मोजमाप कोणत्याच परिमाणात करता येणं अशक्य’
- ‘सुप्रिया सुळे थापा मारताय की हे सगळेच लोकप्रतिनिधी…’, भातखळकरांचा हल्लाबोल
- ‘सत्तेची खुर्ची डळमळली तेव्हा मुंबई”करां”ची आठवण झाली’; आशिष शेलारांची टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
