Share

राष्ट्रवादी पक्षाच्या मागे विचारांची एक मोठी ताकद आहे- जयंत पाटील

Published On: 

🕒 1 min read

सांगली: राज्याचे जलसंधारण मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी आज नवीन वर्षाची सुरुवात वाळवा तालुक्यातील साखराळे गावात उपस्थित राहून “एक तास राष्ट्रवादीसाठी- आगामी महाराष्ट्राच्या विकासासाठी” या उपक्रमाने केली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला देशाचे नेते खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांचे नेतृत्व लाभलेले आहे. पक्षाच्या मागे विचारांची एक मोठी ताकद आहे. या विचारांचा प्रसार करण्यासाठी आपण हा उपक्रम राबवत आहोत. या उपक्रमाच्या माध्यमातून राष्ट्रवादी विचारांच्या कार्यकर्त्यांची फळी निर्माण करायची असल्याचे जयंत पाटील यांनी ट्वीट करत म्हटले आहे.

तसेच प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत बैठक घ्यावी, वैचारिक देवाणघेवाण करावी, आपल्या गावाचा, शहराचा, जिल्ह्याचा विकास कसा होईल यासाठी विचारमंथन करावे. आपला पक्ष हा शिस्तप्रिय आहे, या उपक्रमाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांमध्ये शिस्त रुजली पाहिजे. असे आवाहनही जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिले आहे. ते “एक तास राष्ट्रवादीसाठी- आगामी महाराष्ट्राच्या विकासासाठी” या उपक्रमात सांगली येथील वाळवा तालुक्यातील साखराळे गावात बोलत होते.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!