Share

तुम्हाला ते जमलं नाही निदान नाच्याचं काम तरी नीट करा; भास्कर जाधवांचा राणेंवर पलटवार

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची सुरवात अतिशय तापलेल्या वातावरणामध्ये झाली. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीं (Narendra Modi)ची नक्कल केली. यावरुन केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayana Rane) यांनी भास्कर जाधवांना नाचाची उपमा दिली आहे.

कोकणात काही भागात नाचे आहेत. ते होळीच्या वेळी पैसे घेऊन नाचतात. त्यातला तो प्रकार त्या दिवशी सभागृहामध्ये झाला असल्याचे नारायण राणे म्हणाले आहेत. यावरुन आता भास्कर जाधवांनीही सडेतोड उत्तर दिले आहे. ‘नारायण राणेंनी जरा चांगली नक्कल करावी’, असं म्हणत भास्कर जाधव यांनी नारायण राणे यांच्यावर पलटवार केला आहे.

तुम्ही संसदेत एका खासदाराला दिलेले उत्तर संपूर्ण देशाने पाहिले आहे, तुम्हाला ते जमलं नाही आता निदान नाच्याचे काम तर चांगले करा आणि नाव कमवा, अशी टीका भास्कर जाधव यांनी नारायण राणेंवर पलटवार केली आहे. तसेच भास्कर जाधव यांनी विरोधकांना धर्मही समाजवून सांगितला आहे. भाजपचे लोक इतरांना सौजन्याने वागण्याचे सल्ले देतात, मात्र त्यांच्या पक्षाचे लोक तालिका अध्यक्षांवर काहीही बोलतात, तेव्हा कुठे गेला होता तुमचा राधासुता धर्म? असा सवाल भास्कर जाधव यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, नारायण राणे हे नितेश राणे चुकीचे वागत असतानाही मुलाच्या पाठिशी उभे राहत पाठराखण करत आहेत, असेही ते म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!