🕒 1 min read
मुंबई : राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला २२ डिसेंबरपासून सुरुवात झाली असून आज हे अधिवेशन संपणार आहे. आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस असूनही विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी कायदेशीर मुद्दे उपस्थित करीत अध्यक्ष पदाची निवड करण्याबाबत निर्णय जाहीर केला नाही. मात्र ही निवडणूक आजच घ्यावी, या मागणीवर महाविकास आघाडीचे नेते ठाम आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यपालांवर टीका केली आहे.
संजय राऊत म्हणाले, विधानसभा अध्यक्ष निवडीसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्र पाठवले आहे. विधानसभा अध्यक्षाची निवड करण्याचा अधिकार विधानसभेला आहे. तरीही राज्यपाल जर अडथळे आणत असतील तर असे वाटते की त्यांच्यावर कोणीतरी दबाव आणत आहे. भाजप राज्यपालांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन राज्य सरकारवर निशाणा साधत आहे. असे संजय राऊत यावेळी म्हणाले.
विधानसभा के स्पीकर के चुनाव के विषय पर CM ने राज्यपाल को पत्र लिखा है। स्पीकर का चुनाव कराना विधानसभा का अधिकार होता है, इसके बावजूद राज्यपाल अगर रूकावट डालते हैं तो उससे लगता है कि उनपर कोई दबाव है।BJP राज्यपाल के कंधे पर बंदूक रखकर अपना एजेंडा चलाना चाहती है: संजय राउत, शिवसेना pic.twitter.com/ImMWIdfLga
— ANI_HindiNews (@AHindinews) December 28, 2021
विधानसभेचे हक्क, सरकारच्या शिफारसी, लोकभावना डावलून काम करण्यासाठी राज्यपालांची नियुक्ती होत नाही. राज्यपाल अभ्यासू, विद्वान आहेत. पण त्या अभ्यासाचे आणि विद्वत्तेचे अजीर्ण होऊ नये. महाराष्ट्राच्या राजभवनामध्ये अभ्यासाचे अजीर्ण झाले आहे. अजीर्ण झाल्यावर पोटाचा त्रास सुरु होतो. असा त्रास जर काही लोकांना झाला असेल महाराष्ट्राचे आरोग्य खातं सक्षम आहे. ते उपचार करतील’ असे राऊत म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- गुंडांनी भगवी वस्त्र धारण केल्यास त्यांना संत म्हणता येणार नाही; छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांची टीका
- “अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्यांना तत्काळ अटक करा”, चित्रा वाघ आक्रमक
- …तर राज्य सरकारने दोन दोन हात करण्याची हिंमत दाखवावी- भास्कर जाधव
- ‘मविआ’ने अल्टीमेटम देताच राज्यपालांचे मुख्यमंत्र्यांना बंद लिफाफ्यात पत्र
- राज्यपालांच्या अभ्यासाचे आणि विद्वत्तेचे अजीर्ण होऊ नये- संजय राऊत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
