Share

राज्यपालांच्या अभ्यासाचे आणि विद्वत्तेचे अजीर्ण होऊ नये- संजय राऊत

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला २२ डिसेंबरपासून सुरुवात झाली असून आज(२८ डिसें.)हे अधिवेशन संपणार आहे. आज या अधिवेशनाचा शेवटचा दिवस असला तरी अद्यापही विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी कायदेशीर मुद्दे उपस्थित करीत तारीख निश्चित केलेली नाही. असे असले तरी ही निवडणूक आज घेण्याबाबत महाविकास आघाडीचे नेते ठाम आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना याविषयी भाष्य केले आहे.

यासंदर्भात बोलत असतांना राऊत म्हणाले की,’मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाठवलेले उत्तर तुमच्या समोर आहे. राज्यपालांनी इतका अभ्यास करु नये असे मी कालही म्हणालो होतो. घटनेमध्ये ज्या तरतुदी आहेत त्यानुसार काम करण्यासाठी राज्यपालांची नेमणुक होते. विधानसभेचे हक्क, सरकारच्या शिफारसी, लोकभावना डावलून काम करण्यासाठी राज्यपालांची नियुक्ती होत नाही. राज्यपाल अभ्यासू, विद्वान आहेत. पण त्या अभ्यासाचे आणि विद्वत्तेचे अजीर्ण होऊ नये. महाराष्ट्राच्या राजभवनामध्ये अभ्यासाचे अजीर्ण झाले आहे. अजीर्ण झाल्यावर पोटाचा त्रास सुरु होतो. असा त्रास जर काही लोकांना झाला असेल महाराष्ट्राचे आरोग्य खातं सक्षम आहे. ते उपचार करतील’, असे राऊत म्हणाले आहेत.

दरम्यान, पुढे ते म्हणाले की,’अधिवेशन उत्तम पद्धतीने सुरू झाले असून आज शेवटचा दिवस आहे. मुख्यमंत्री जिथून आहेत तिथून अधिवेशन नियंत्रित करत आहेत. सरकारच्या कामकाजात सहभागी होत आहेत. आज शेवटचा दिवस आहे, त्यामुळे वेट अँड वॉच.. पहा काय होतंय ते’, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!