🕒 1 min read
नवी-दिल्ली : भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा आज(२८ डिसें.) स्थापना दिवस आहे. २८ डिसेंबर १९८५ ला याची स्थापना झाली असून आज तब्बल १३७ वर्ष पूर्ण झाली आहेत. देशभरात आजचा दिवस काँग्रेस स्थापना दिवस म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी(Rahul Gandhi) यांनी ज्या पक्षाने देशात लोकशाही प्रस्थापित केली त्याचे आम्ही वारस आहोत, असे म्हणत शुभेच्छा दिल्या आहेत.
यासंदर्भात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,’आम्ही काँग्रेस आहोत- असा पक्ष ज्याने आपल्या देशात लोकशाही प्रस्थापित केली आणि आम्हाला या वारसाचा अभिमान आहे’, असे ते म्हणाले.
We are Congress- the Party which laid the foundation of our democracy & we are proud of this legacy.
Best wishes on #CongressFoundationDay.
हम कांग्रेस हैं- वो पार्टी जिसने हमारे देश में लोकतंत्र की स्थापना की और हमें इस धरोहर पर गर्व है।#कांग्रेस_स्थापना_दिवस की शुभकामनाएँ। pic.twitter.com/c2pg7Vx1nl
— Rahul Gandhi (@RahulGandhi) December 28, 2021
दरम्यान, मुंबईतील गोपालदास संस्कृत कॉलेज मैदान येथे २८ डिसेंबर १९८५ रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची स्थापना झाली. ज्याचे प्रथम अध्यक्ष व्योमेशचंद्र बनर्जी होते. तसेच याच पार्श्वभूमीवर आज नवी दिल्ली येथे स्थापना दिवस निमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी तसेच खासदार राहुल गांधी उपस्थित होते.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘भारत आणि सनातन संस्कृती या दोघांच्याही आत्म्याला दुखावण्याचा जो प्रयत्न करेल त्याला…’
- रोहिणी खडसेंच्या गाडीवर हल्ला करणाऱ्यास जशास तसे उत्तर देण्यात येईल; राष्ट्र्वादीचा इशारा
- रोहिणी खडसे हल्ल्याचा मुद्दा विधानसभेत मांडणार- चंद्रकांत पाटील
- ‘…यामुळे सापसुद्धा चावतो ही आधीच माहीत असलेली गोष्ट नव्याने समजली’
- ‘संत मुक्ताईच्या भूमीत महिला सुरक्षित राहतील ना?’, रोहिणी खडसेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
