Share

“माझ्या अनेक मुद्द्यांना मंत्र्यांनी बगल दिली”, प्रविण दरेकरांचा आरोप

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाचा (Winter Session) आज चौथा दिवस आहे. विरोधकांकडून विविध मुद्द्यांवर प्रश्न उपस्थित करत महाविकास आघाडी सरकारला (Mahavikas Aghadi Government) घेरण्याचा प्रयत्न केला जात आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह अनेक विरोधी पक्षातील नेते विविध प्रश्न उपस्थित करत सरकारवर निशाणा साधत आहेत. याबाबत आता विधन परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी मी उपस्थित केलेल्या अनेक मुद्द्यांना मंत्र्यांनी बगल दिली, असा आरोप केला आहे.

याबाबत प्रविण दरेकर यांनी ट्विट केले आहे. दरेकर ट्विट करत म्हणले, जे शेतकरी नियमित कर्जफेड करतात त्यांना प्रोत्साहनपर अनुदान देऊ, अशी घोषणा महाविकास आघाडी सरकारने केली होती, त्याबाबत मी उपस्थित केलेल्या मुद्याबाबत मंत्र्यांनी उत्तरात काहीच भाष्य केले नाही. कृषी पंपाचे कनेक्शन सरसकट तोडले जात आहेत, शेतकरीविरोधी ही मोहीम थांबवावी, अशी मागणी मी केली होती, एसटी कर्मचार्‍यांशी समन्वय साधून मार्ग काढावा, सर्व राज्यांनी केंद्राप्रमाणे राज्याचा व्हॅट कमी केला, मविआ सरकारने व्हॅट कमी न केल्याने पेट्रोल-डिझेल वाढीव दराने खरेदी करावे लागते आहे, अशा अनेक मुद्यांना मंत्र्यांनी बगल दिली. असा आरोप प्रविण दरेकर यांनी केला आहे.

प्रविण दरेकरांनी उपस्थित केलेले प्रश्न

पीक विम्याच्या अतिरीक्त रक्कमेची आकडेवारी मांडत दरेकर म्हणाले होते, फडणविस यांच्या काळात १५,७८२ कोटी विमा हप्ता पीकविमा कंपन्यांना दिला होता. त्यापैकी १३५३८.८० कोटी शेतकऱ्यानां नुकसान भरपाई पोटी परत मिळाले. परंतु महाविकास आघाडी सरकारच्या काळात ९,७१९.९२ कोटी विमा हप्ता कंपनीला दिला त्यापैकी केवळ ३,५०४ कोटी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पोटी परत मिळाले आहे. याचाच अर्थ विमा कंपन्याना दोन वर्षांच्या काळात ६,२१५ कोटी अतिरीक्त गैरव्यवहारातून कमावले आहेत. यापैकी किती रक्कम कंपनीच्या खिशात गेली व किती रक्कम महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांच्या खिशात गेली? असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता.

यंदा राज्यातील हजारो शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ अद्यापही मिळालेला नाही, चक्रीवादळ व अतिवृष्टग्रस्तांसाठी जाहिर केलेल्या ११ हजार कोटी रुपये पॅकेजचा लाभ अनेक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला नाही. शेतकऱ्यांना वाढीव वीज बिले देण्यात आले असून, या बिलांची सक्तीने वसूली सुरु आहे. सहकारी साखर कारखान्यांकडील थकीत कर्जाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. सरकारच्या भ्रष्ट कारभारामुळे राज्यातील अनेक सहकारी बँक अडचणीत आल्या आहेत.

कोवीडच्या दोन वर्षाच्या कालावधीत सरकारचा विकास पूर्णपणे ठप्प झाला आहे. या काळातही कोट्यावधी रुपयांचा गैरव्यवहार झाला. त्यामुळे आज राज्यातील शेतकरी, कामगार, एस.टी.कर्मचारी हा सर्व वर्ग असमाधानी असून, महाविकास आघाडी सरकारच्या कारभाराला कंटाळलेला आहे. सरकार व जनता यामध्ये समन्वय नसल्यामुळे, महाराष्ट्रासारखे राज्य अनेक वर्ष विकासापासून पाठी गेले आहे. अशी जोरदार टिका प्रविण दरेकर यांनी केली होती.

महत्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!