🕒 1 min read
मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांनी दिवाळीपूर्वीपासून एसटीचे विलीनीकरण या प्रमुख मागणीसाठी संप पुकारला आहे. (Maharashtra ST bus strike) तो अद्यापही सुरुच आहे. काही दिवसांपूर्वी कर्मचाऱ्यांना वेतनात ४१ टक्के वाढ दिली, विलीनीकरणासाठी समितीही नेमण्यात आली. तरीही एसटी कर्मचाऱ्यांनी लाखो प्रवाशांना वेठीस धरून संप सुरूच ठेवला आहे. याच पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक(Nawab Malik) यांनी यामुद्द्यावर भाष्य केले आहे.
यासंदर्भात माध्यमांशी संवाद साधतांना नवाब मलिक म्हणाले की, एसटी आंदोलन ज्या लोकांनी पुकारले होते त्यांनी माघार घेतली आहे. दुखवट्याच्या नावाखाली काही लोक दिशाभूल करत आहेत. कोर्टांनेही त्यावर ताशेरे ओढले आहेत.’
एसटी आंदोलन ज्या लोकांनी पुकारले होते त्यांनी माघार घेतली आहे. दुखवट्याच्या नावाखाली काही लोक दिशाभूल करत आहेत. कोर्टांनेही त्यावर ताशेरे ओढले आहेत, अशी माहिती अल्पसंख्याक मंत्री ना. @nawabmalikncp यांनी माध्यमांशी बोलताना दिली.#WinterSession2021 #STStrike pic.twitter.com/J0gomYKz1R
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) December 24, 2021
दरम्यान, एखादा वकील जर पैसे घेऊन लोकांची दिशाभूल करत असेल आणि स्वतःचे हित साध्य करत असेल, ते योग्य नाही. सरकारच्या माध्यमातून पगारवाढ करण्यात आली आहे. त्यांना विलीन करून सरकारी कर्मचारी घोषित करता येत नाही. कोणी दिशाभूल करत असेल त्याला बळी पडू नये, असे आवाहनही मलिक यांनी केले आहे. तसेच विलीनीकरणाच्या मागणीवर कर्मचारी ठाम नाहीत. काही वकील त्यांची दिशाभूल करत आहेत. हळुहळू कर्मचारी कामावर रूजू होत आहेत, असेही नवाब मलिक यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
- ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा निर्बंध, रात्री जमावबंदी; आज होणार नवीन नियमावली जाहीर
- “तेव्हा बघ्याची भूमिका घेणारे फडवणीस सभागृहात मोदींची नक्कल होताच….”; रुपाली पाटलांची टीका
- “मी म्याव म्याव केलं कारण…”; नितेश राणेंचं स्पष्टीकरण
- सत्तेचा माज चढणे म्हणजे काय हे शिवसेनेकडून शिकावं- अतुल भातखळकर
- “…यावरून राज्यकारभाराचा काय बट्ट्याबोळ झाला आहे याची कल्पना यावी”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

