औरंगाबाद: भोकरदन येथील ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयांचे ट्राॅमा केअर सेंटरसह ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये श्रेणीवर्धन करुन इमारतीचे बांधकाम करण्यासाठी जुलै २०१९ मध्ये यापूर्वीच मंजुरी मिळाली होती. आता यासाठी १ कोटींचा निधी पुरवणी अर्थसंकल्पात मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे भोकरदन येथील नागरिकांना उपचारांसाठी आता शहरात जाण्याची गरज भासणार नाही.
४ ऑक्टोंबर रोजी भोकरदन ग्रामीण रुग्णालयाचे ५९ खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन करुन इमारतीचे बांधकाम करण्यासाठी २२ कोटी ५२ लाख १३ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यासाठी प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली होती. आता एकूण निधीपैकी १ कोटी रुपयांच्या (टोकन अमाऊंट) निधीची तरतुद विधीमंडळाच्या पुरवणी अर्थसंकल्पामध्ये गुरुवारी झालेल्या अधिवेशनात करण्यात आली आहे.
निधी मंजुर करण्यात आल्यामुळे भोकरदन उपजिल्हा रुग्णालयाचे प्रत्यक्ष काम सुरु करण्यासाठी आता कोणतीही अडचण नसून या कामाची निवीदा प्रक्रिया तातडीने पूर्ण करुन प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्यात येणार आहे. त्यामुळे भोकरदन शहरासह तालुक्यातील जनतेसाठी लवकरच सर्व सोयीसुविधांनी सुसज्ज असे उपजिल्हा रुग्णालय होणार आहे. भोकरदन ग्रामीण रुग्णालयाचे ट्राॅमा केअर सेंटरसह उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन झाल्याचा आनंद होत आहे. असे भाजपा जिल्हाध्यक्ष आ. संतोष दानवे म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- “सत्ता गेल्यानं आलेला हताशपणा विरोधकांच्या चेहऱ्यावर दिसत आहे”
- “राज्यासमोरील भीषण समस्यांवर उत्तरे शोधण्यात या सरकारला जराही रस नाही”
- जडेजावरही चढला ‘पुष्पा’ चित्रपटाचा फिव्हर, पहा भन्नाट व्हिडीओ
- तुकाराम सुपेच्या कार्यालयात आणखी सापडलं ३३ लाखांचं घबाड
- महाराष्ट्र एकीकरण समितीची ‘सिल्व्हर ओक’वर धाव; राज्यातील खासदारांना पवार करणार एकत्र
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

