🕒 1 min read
मुंबई : राज्या विधीमंडळाच्या अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. नेहमीप्रमाणे हिवाळी अधिवेशनाची तापलेल्या वातावरणात सुरुवात झाली. सलग 3 दिवस सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तुफान खडाजंगी पाहायला मिळाली. सत्ताधारी आपली बांजू मांडण्यात कमी पडले नाही तर विरोधक त्यांचे मुद्दे खोडून काढण्यात कमी पडले नाहीत.
विरोधक सातत्याने महाविकास आघाडीला घोटाळेबाज सरकार म्हणून हिणवत आहे. विरोधकांच्या या टीकेला आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी रोखठोक उत्तर दिले आहे. हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विरोधी पक्ष भाजपवर जोरदारा टीका केली आहे.
विधानसभेत गदारोळ करु असे म्हणणाऱ्या विरोधकांचा बार फुसका निघाला आहे. विरोधकांचं सरकारच घोटाळेबाज होतं म्हणून त्यांना सगळीकडे घोटाळेच दिसतात, असा खोटक टोला नाना पटोले यांनी लगावला आहे. विधिमंडळाच्या कामकाजाचा कालावधी वाढवून देण्याची मागणी भाजप करत आहे. मात्र, स्वतःवरील कलंक पुसण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात आहे. विधानसभा आपला राग काढण्यासाठी नाही.
दरम्यान, सत्ता गेल्याचा हताशपणा भाजपमध्ये दिसला. याशिवाय महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारला अडचणीत आणू, हा भाजपचा फुसका बार निघाला. भाजप स्वतः घोटाळेबाज आहे. त्यामुळेच त्यांना सगळीकडे घोटाळे दिसत आहे, अशी घणाघाती टीकाही नाना पटोले यांनी यावेळी बोलताना केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ओबीसी आरक्षणसाठी चालढकल केल्याने भाजपचे विधिमंडळासमोर धरणे
- “तेव्हा बघ्याची भूमिका घेणारे फडवणीस सभागृहात मोदींची नक्कल होताच….”; रुपाली पाटलांची टीका
- राहुल द्रविडचे संघासोबतचे फोटो पाहून चाहत्यांना झाली कोहलीची आठवण
- रामदास कदम यांना विधानभवनाच्या गेटवर अडवलं
- रहाणे, अय्यर की विहारी पहिल्या कसोटी कोण खेळणार?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

