Share

जडेजावरही चढला ‘पुष्पा’ चित्रपटाचा फिव्हर, पहा भन्नाट व्हिडीओ

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : नुकताच प्रदर्शित झालेला साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनचा (Allu Arjun)  ‘पुष्पा: द राइज’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या प्रचंड पसंतीस उतरला आहे. या चित्रपटाने रेकॉर्डब्रेक कमाई केली असून या चित्रपटाला लोकांकडून भरभरून प्रेम मिळत आहे, चित्रपटाची जादू केवळ सर्वसामान्यांवरच नाही तर भारतीय संघाचा खेळाडू रवींद्र जडेजाच्याही माथी चढली आहे. या चित्रपटाचे डायलॉग्स बोलत असतानाचा व्हिडिओ या क्रिकेटरने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

त्याच्या इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये, जडेजा अल्लू अर्जुनच्या ब्लॉकबस्टर चित्रपट पुष्पामधील फेस डायलॉग बोलताना दिसत आहे. जाडेजाच्या या पोस्टवर डावखुरा फिरकी, गोलंदाज कुलदीप यादवनेही कमेंट केली आहे. “पुढच्या चित्रपटाची वाट पाहतोय…!” यावर जडेजानेही भन्नाट उत्तर दिले की, “हो शूटिंग एनसीएमध्ये होईल.”

https://www.instagram.com/reel/CX0u9KvF7Kl/?utm_source=ig_web_copy_link

पुष्पा चित्रपट शुक्रवारी, 17 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. पहिल्या दिवशी चित्रपटाची सुरुवात थोडी संथ झाली, मात्र शनिवारपासून या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाने कमाईच्या बाबतीत वेग पकडला. पुष्पा द राइज हिंदीत रिलीज झाल्याने प्रेक्षक खूप खूश आहेत. या चित्रपटाला हिंदी भाषिक प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

अल्लूच्या डायलॉगपासून ते अॅक्शनपर्यंत सर्व काही चित्रपटात दमदार आहे. रिलीजच्या पहिल्या आठवड्यात पुष्पाने जबरदस्त कलेक्शन केले होते. सोमवारी आणि मंगळवारीही या चित्रपटाने विक्रमी कमाई केली, तर कमाईच्या बाबतीत सहाव्या दिवशी पुष्पाने पहिल्या दिवसापेक्षा जास्त कमाई केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!