🕒 1 min read
मुंबई : आरोग्य भरती घोटाळा, पेपर फुटी प्रकरण समोर आल्यानंतर विरोधकांनी आणि विद्यार्थ्यांनी महाविकास आघाडी सरकारवर सडकून टीका केली होती. त्यानंतर १२ डिसें.रोजी राज्यातील म्हाडाच्या परिक्षा ऐनवेळी रद्द झाल्याने पुन्हा एकदा राज्य सरकारचा ढिसाळ कारभार समोर आला आहे. म्हाडा परिक्षा रद्द झाली असल्याची घोषणा राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड(Jitendra Awhad) यांनी मध्यरात्री २ वाजता केली होती. असे असतांनाच आता ऐन मुलाखतीच्या दिवशी अमरावती जिल्हा परिषदेची भरती प्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्याची माहिती महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अधिकारी कैलास घोडकी(Kailas Ghodki) यांनी दिली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.
याच पार्श्वभूमीवर आता भाजप नेते अतुल भातखळकर(Atul Bhatkhalkar) यांनी राज्य सरकारसह जिल्हा परिषदेवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे. यासंदर्भात भातखळकरांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,’म्हाडा भरतीप्रमाणेच ऐनवेळी अमरावती जिल्हा परिषदेच्या मुलाखती रद्द केल्याने विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. निर्लज्ज राज्य सरकारच्या पावलावर पाऊल ठेवून जिल्हा परिषदही परीक्षा आयत्या वेळी रद्द करते यावरून एकूणच राज्यकारभाराचा काय बट्ट्याबोळ झाला आहे याचे कल्पना यावी’, असे भातखळकर म्हणाले आहेत.
म्हाडा भरतीप्रमाणेच ऐनवेळी अमरावती जिल्हा परिषदेच्या मुलाखती रद्द केल्याने विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
निर्लज्ज राज्य सरकारच्या पावलावर पाऊल ठेवून जिल्हा परिषदही परीक्षा आयत्या वेळी रद्द करते यावरून एकूणच राज्यकारभाराचा काय बट्ट्याबोळ झाला आहे याचे कल्पना यावी. pic.twitter.com/bQvQ0QTiwV— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) December 24, 2021
दरम्यान, यासंदर्भात माध्यमांशी संवाद साधत असतांना कैलास घोडकी म्हणाले की, ‘काही तांत्रिक अडचणीमुळे २३ डिसेंबर २०२१ रोजी आयोजित मुलाखती पुढील दिनांकापर्यंत पुढे ढकलली आहे. मुलाखतीची तारीख आणि वेळ लवकरच करण्यात येईल’.
महत्त्वाच्या बातम्या
- ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा निर्बंध, रात्री जमावबंदी; आज होणार नवीन नियमावली जाहीर
- “तेव्हा बघ्याची भूमिका घेणारे फडवणीस सभागृहात मोदींची नक्कल होताच….”; रुपाली पाटलांची टीका
- “मी म्याव म्याव केलं कारण…”; नितेश राणेंचं स्पष्टीकरण
- सत्तेचा माज चढणे म्हणजे काय हे शिवसेनेकडून शिकावं- अतुल भातखळकर
- वेंगसरकरांचे गांगुली-विराटबाबत मोठं वक्तव्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
