Share

मोदींची नक्कल करणाऱ्या भास्कर जाधवांना तात्काळ निलंबित करा; देवेंद्र फडणवीस आक्रमक

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्य विधिमंडळाच्या अधिवेशन आजपासून सुरु झाले आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्तधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपल्याचे पाहायला मिळाले आहे. यावेळी शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल केल्यामुळे भाजपच्या सदस्यांनी विधानसभा गोंधळ घेतला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस भास्कर जाधव यांनी केलेल्या कृत्यावरुन तीव्र आक्षेप नोंदवत भास्कर जाधव यांना तात्काळ निलंबित करा, अशी मागणी केली आहे.

पंतप्रधानांविषयी अशाप्रकारे अंगविक्षेप करुन बोलताना लाज वाटली पाहिजे. यासाठी भास्कर जाधव यांनी माफी मागितलीच पाहिजे, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

सभागृहात चर्चा सुरु असताना नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या 15 लाखांच्या आश्वासनाचा मुद्दा उपस्थित झाला. तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी, नरेंद्र मोदी कधीच असे बोलले नाही, असा दावा केला. त्यावर भास्कर जाधव यांनी जागेवर उभे राहत नरेंद्र मोदी यांच्या शैलीत त्यांची वाक्य बोलून दाखवली. हे पाहून देवेंद्र फडणवीस यांच्या संतापाचा पारा चढला. सभागृहात देशाच्या पंतप्रधानांची नक्कल करणे, हे योग्य नव्हे. सभागृहात अशाप्रकारचा पायंडा पडता कामा नये, असे देवेंद्र  फडणवीस म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!