नवी-दिल्ली : गत दोन वर्षांपासून कोरोनामुळे(Corona) जनजीवन विस्कळीत झाले होते ते पूर्वपदावर येत असतानाच आता कोरोनाच्या नव्या विषाणुने संपूर्ण जगाची चिंता वाढवली आहे. दक्षिण अफ्रिकेत आढळलेल्या ‘ओमायक्रॉन’(Omicron) हा विषाणू जास्त वेगाने फैलावणारा असल्याने अनेक देशांनी धास्ती घेतली आहे. यातच आता इस्त्रायलने या चिंतेत भर टाकली असून इस्त्रायलमध्ये ओमायक्रॉनमुळे पहिला मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दक्षिणेकडील शहर बेर्शेबा येथील सोरोका रुग्णालयात दाखल ६० वर्षीय व्यक्तीचा सोमवारी(२० डिसें.) मृत्यू झाला. तसेच रुग्णाला इतर व्याधीही असल्याचे सांगितले जात आहे. परंतु यासंदर्भात सविस्तर माहिती अद्यापही मिळालेली नाही.
दरम्यान, ओमायक्रॉनमुळे एका रुग्णाचा मृत्यू होताच इस्त्रायलने देशातून बाहेर येणारी-जाणारी हवाई वाहतूक थांबवली आहे. यासंदर्भात बोलतांना इस्त्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांनी वृद्ध नागरिक तसेच गंभीर आजारांचा सामना करत असलेल्यांसाठी चौथ्या बूस्टर डोसला मंजुरी देण्यासंबंधी आपण विचार करत असल्याचे सांगितले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- हिवाळी अधिवेशनाचा आज पहिला दिवस; विविध मुद्यांवरुन भाजपा ठाकरे सरकारला घेरणार?
- “अमित शहा मस्त असले तरी त्यांचे महाराष्ट्रातील चेले हे महामस्त आहेत”
- ‘शिवसेनेला पोकळ आव्हाने देण्यापेक्षा लडाखमध्ये घुसलेल्या चिन्यांशी लढून दाखवा’
- .तर यंदा औरंगाबादेतील क्रांती चौकात थाटात साजरी होणार शिवजयंती
- बदनापूर नगर पंचायतीत बाचाबाचीचे रुपांतर मारहाणीत; आ. नारायण कुचे-संतोष सांबरेत हमरीतुमरी..!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

