Share

“जयंतराव, हा शहाणपणा राजू नवघरे आणि नवाब मलिकांना सांगा”

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : कर्नाटकातील बंगळुरूमध्ये गुरुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना झाली होती. त्यामुळे देशभरातून संताप व्यक्त होत आहे. यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आमची अस्मिता आहे. आमच्या अस्मितेचा कोणी अपमान करत असेल तर आम्ही हे कदापि सहन करणार नाही. कर्नाटक सरकारने या समाजकंटकांना शोधून त्यांच्यावर कठोर करावी, असे जयंत पाटील म्हणाले होते. यावर आता भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

याबाबत भातखळकर ट्विट करत म्हणाले, ”कर्नाटक सरकारने कारवाई केलीच आहे, जयंतराव, हा शहाणपणा जमल्यास स्वपक्षीय राजू नवघरे आणि नवाब मलीकला सांगा.” अशी टीका अतुल भातखळकरांनी केली.

या घटनेनंतर जयंत पाटील यांनी राज्यभरात शिवरायांच्या प्रत्येक पुतळ्याला राष्ट्रवादीकडून दुग्धाभिषेक घातला जाणार असल्याची घोषणा केली. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी शिवाजी महाराज यांचा पुतळा आहे, त्या सर्व ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते जाऊन महाराजांना दुग्धाभिषेक करतील. छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहेत. महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक पुतळ्याला दुग्धाभिषेक करून पक्षाचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी व लोकप्रतिनिधी अभिवादन करतील, असे जयंत पाटील म्हणाले होते.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!