Share

‘ज्या स्त्रीने देशासाठी ३२ गोळ्या छातीवर झेलल्या त्या स्त्रीचे साधे नाव सुद्धा घेतले जात नाही’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: काल 16 डिसेंबर रोजी दिल्लीत ‘विजय दिन’ साजरा करण्यात आला. १६ डिसेंबर १९७१ मध्ये भारताने पाकिस्तान विरुद्धचे युद्ध जिंकले होते. या पार्श्वभूमीवरच भारतात 16 डिसेंबर हा दिवस ‘विजय दिन’ म्हणून साजरा केला जातो. मात्र दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात इंदिरा गांधी यांच्या नावाचा उल्लेख कुठेही करण्यात आला नाही असा आरोप काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी एका सभेत बोलताना केला.

‘मला तो दिवस आठवला ३१ ऑक्टोबर ज्या दिवशी माझी आजी (इंदिरा गांधी ) देशासाठी शहीद झाल्या. त्यानंतर मला आठवला २१ मे ज्यादिवशी माझे वडील (राजीव गांधी ) देशासाठी शहीद झाले. कुर्बानी (त्याग ) चे नाते आहे, तुमचे आणि माझे. बांगलादेश युद्धानिमित्त दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात इंदिरा गांधींचे साधे नाव सुद्धा घेतले नाही. ज्या स्त्रीने या देशासाठी ३२ गोळ्या छातीवर झेलल्या त्या स्त्रीचे साधे नाव सुद्धा घेतले जात नाही. कारण हे सरकार सत्याला घाबरते. असा आरोप करत खासदार राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.

दरम्यान भारत-पाकिस्तान यांच्यात झालेल्या ७१ च्या युद्धात भारताचे ३९०० सैनिक शहीद झाले. तर ९८५१ जवान जखमी झाले. पूर्व पाकिस्तानच्या सैन्याचे कमांडर लेफ्टनंट जनरल आमिर अब्‍दुल्‍ला खान नियाझी यांच्या नेतृत्वात पाकिस्तानच्या ९३ हजार सैनिकांनी हातातील शस्त्र जमिनीवर ठेवून भारतासमोर बिनशर्त शरणागती पत्करली.भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या युद्धानंतर बांगलादेशची निर्मिती झाली. या युद्धाचे स्मरण राहावे म्हणून 16 डिसेंबर हा दिवस ‘विजय दिन’ म्हणून साजरा केल जातो.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!