Share

१९७१ च्या युद्धात सर्वोच्च बलिदान देणाऱ्या भारतीय जवानांच्या शौर्याला सलाम- शरद पवार

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: १६ डिसेंबर या दिवशी भारतात विजय दिवस (विजय दिन) साजरा केला जातो. याच दिवशी म्हणजेच १६ डिसेंबर १९७१ मध्ये भारताने पाकिस्तान विरुद्धचे युद्ध जिंकले होते. म्हणून आजचा दिवस हा ‘विजय दिन’ म्हणून साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवरच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी ट्वीट करत युद्धात सर्वोच्च बलिदान देणाऱ्या भारतीय जवानांच्या शौर्याला सलाम करत देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.

‘१९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात पाकिस्तानला शरणागती पत्करण्यास भाग पाडून भारतीय सैन्याने ऐतिहासिक विजय मिळवला. या युद्धात सर्वोच्च बलिदान देणाऱ्या भारतीय जवानांच्या शौर्याला सलाम. सर्व देशवासियांना विजय दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!’ असे ट्वीट शरद पवार यांनी केले आहे.

दरम्यान भारताने १९७१ मध्ये १६ डिसेंबर या दिवशी पाकिस्तान विरुद्धचे युद्ध जिंकले. आणि स्वतंत्र झालेला पूर्व पाकिस्तान हाच आज बांगलादेश या नावाने ओळखला जातो. या ऐतिहासिक घटनेचे स्मरण करण्यासाठी १९७२ पासून दरवर्षी १६ डिसेंबर या दिवशी भारतात विजय दिवस (विजय दिन) साजरा केला जातो. या युद्धात भारताच्या ३९०० सैनिकांनी हौतात्म्य पत्करले. युद्धात भारताचे ९८५१ जवान जखमी झाले होते. यानंतर १७ डिसेंबर रोजी पाकिस्तानच्या ९३ हजार सैनिकांना युद्धबंद्यांना देतात तशीच वागणूक देण्याचा निर्णय भारताने घेतला. या युद्धाचे वैशिष्ट्ये म्हणजे पूर्व पाकिस्तानच्या सैन्याचे कमांडर लेफ्टनंट जनरल आमिर अब्‍दुल्‍ला खान नियाझी यांच्या नेतृत्वात पाकिस्तानच्या ९३ हजार सैनिकांनी हातातील शस्त्र जमिनीवर ठेवून भारतासमोर बिनशर्त शरणागती पत्करली होती.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!