🕒 1 min read
औरंगाबाद : औरंगाबाद शहरात लसीकरणाबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात येत आहे. मात्र अजूनही ७० हजार नागरिकांनी दुसरा डोस घेतलेला नाही. औरंगाबाद महानगरपालिका आपले लसीकरणाचे उद्दीष्ट पूर्ण करू शकलेली नाही. शहरात बनावट प्रमाणपत्र देणारी टोळी सक्रिय झाल्याची माहिती हाती घेत आहे. जिन्सी पोलिसांनी लसीकरणाचे बनावट प्रमाणपत्र देणाऱ्या तीन जणांना रंगेहाथ पकडले आहे. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
लसीकरणाचे बनावट प्रमाणपत्र हे शहरात ५०० ते २ हजार रुपयांपर्यंत मिळत आहे. पोलिसांनी पकडलेल्या या तिघांनी आतापर्यंत शहरात ४०० पेक्षा जास्त बोगस प्रमाणपत्र दिल्याचे उघड झाले आहे. या मधील सर्वात आश्चर्यकारक बाब म्हणजे घाटी रुग्णालयातील डॉ. रझीउद्दीन या टोळीचे मास्टरमाइंड असल्याचे समोर आले आहे. ओमायक्रोन या विषयाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनातर्फे लसीकरणाचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. त्याच बरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जिल्ह्याच्या घेतलेल्या आढाव्यानंतर लसीकरणाचे प्रमाण अत्यंत अल्प असल्याने लसीकरणाबाबत मोठ्या प्रमाणावर मोहीम हाती घेण्यात आली होती.
त्यानंतर जिल्हा प्रशासनाने लसीकरण न झालेल्यांवर विविध प्रकारचे बंधने लादली. त्यामुळे बोगस प्रमाणपत्रांचा सुळसुळाटच निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. याप्रकरणी डॉ. शेख रझीउद्दीन फहीमुद्दीन, डॉ. शेख मोहीउद्दीन शेख फहीमुद्दीन, अबु बकर अल हमीद हादी अल हमीद आणि मोहम्मद मुदस्सीर मोहम्मद अश्पाक यांना अटक करण्यात आली. तर सिस्टर आढाव, शहेनाज शेख सरकारी कागदपत्रांवर लस घेतल्याच्या खोट्या नोंदीवरून बनावट प्रमाणपत्र तयार करत असल्याचे उघड झाले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- पडळकर आणि सदाभाऊ कामगारांच्या पगाराची जबाबदारी घेणार आहेत का?-अनिल परब
- मलिकांविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार; मुन्ना यादवची प्रतिक्रिया
- भाजपा नेते एसटी कर्मचाऱ्यांना चिथवून गलिच्छ राजकारण करत आहेत-सचिन सावंत
- ‘मलिक साहेब, हायड्रोजन सोडा आता तुम्हाला ऑक्सिजनची गरज लागेल’
- भाजपा नेते एसटी कर्मचाऱ्यांना चिथवून गलिच्छ राजकारण करत आहेत-सचिन सावंत

