Share

मनात टिकटिक वाजत असताना रुपाली पाटील सोडणार का बाण?

Published On: 

🕒 1 min read

पुणे : रुपाली ठोंबरे पाटील Rupali Thomabre Patil) यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून (MNS) राजीनामा दिल्याने राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. रुपाली पाटील यांच्या राजीनाम्याने मनसेला मोठा धक्का बसल्याचे मानले जाते. त्यांच्या राजीनाम्याने अनेक प्रश्न अनुत्तरीत राहिले आहेत. रुपाली पाटील आता कोणत्या पक्षाची कास धरणार? हाती शिवबंधन बांधणार की घड्याळ? त्यांनी पक्ष नेमका कोणत्या कारणांसाठी सोडला? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी त्यांनी पुण्यात आज पत्रकार परिषद घेतली.

मी पक्ष सोडला असला तरीही राज ठाकरे आणि मनसेचे कार्यकर्ते यांना माझ्या स्वार्थासाठी कधीच वाईट बोलणार नाही. मनसेच्या काही नेत्यांसदर्भात मी पक्षाच्या चौकटीत राहून माझी अडचण राज ठाकरे यांना कळवली आहे. परंतु, काही कारणांमुळे मी राजीनामा देत आहे. लोकांना न्याय देत असताना खंबीर साथीची गरज असते, हे मी राज ठाकरे यांना कळवले आहे. काही बाबतीत बदल घडत नसेल तर मला स्वत:मध्ये बदल घडवावा लागेल, असे रुपाली पाटील ठोंबरे म्हणाल्या आहेत.

रिकामटेकड्या नेत्यांमुळे रुपाली पाटीलवर ही वेळ आली त्यांना योग्य वेळी उत्तर देईल. भाजपची अद्याप ऑफर आली नाही राज ठाकरे माझे दैवत होते आणि राहतील, असे रुपाली पाटील म्हणाल्या आहेत. ‘मनसेमधून राजीनामा दिल्यानंतर मी पुढे काय भूमिका घेणार आहे लवकर जाहीर करेल. काल मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत माझी भेट झाली. त्यानंतर वरुण देसाई यांच्यासोबतही माझी भेट झाली. ती सदिच्छा भेट होती. त्यानंतर मी राजीनामा दिली आहे’, असे रुपाली पाटील म्हणाल्या आहेत.

मनसेमध्ये काय बदल व्हायला हवेत हे राज ठाकरे सांगू शकतात. कारण राज ठाकरेंना सल्ला देण्याइतकी कार्यकर्ता म्हणून पात्रता नाही. त्यामुळे वैयक्तिकरित्या हा निर्णय घेतला आहे. मनधरणी सगळेच करतात. 14 वर्षे काम करत असताना संघर्ष कसा करायचा या पक्षातून मी शिकले आहे. कोणत्या पक्षात जाणार हे अद्याप ठरवलेले नाही. लवकच निर्णय मी जाहीर करेल, असे रुपाली पाटील म्हणाल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!