नवी दिल्ली: विरोधी पक्षांच्या नेत्यांची पहिली बैठक मंगळवारी सोनिया गांधी यांच्या जनपथ या निवासस्थानी झाली. या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली, यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना माहिती दिली आहे. तसेच यूपीए बाबतही त्यांनी मोठे विधान केले आहे.
देशातील सध्याची राजकीय स्थिती तसेच उत्तर प्रदेशसह ज्या राज्यात विधानसभा निवडणुका आहेत तेथील एकंदर स्थितीवर तसेच त्यात विरोधी पक्ष साधारण एकत्रितपणे काय भूमिका निभावू शकतो यावर प्राथमिक चर्चा झाली असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले आहे. तसेच शिवसेना अधिकृतपणे युपीएचा भाग झाली आहे का नाही? या प्रश्नावरही राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
आम्ही युपीएचा भाग नाही. पण महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यात आम्ही एकत्र काम करत आहोत. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीसारखे तीन प्रमुख पक्ष जेव्हा एकत्र येऊन महाराष्ट्रात सत्ता स्थापन करतात, काम करतात तो मिनी युपीएचाच एक प्रयोग आहे. राज्य स्तरावरील हे युपीए असून उत्तम प्रकारे काम सुरु असल्याची प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे. तसेच यावेळी राऊत यांनी मोदींच्या काशी यात्रेवरही निशाणा साधत टीका केली आहे. पंतप्रधानांच्या तीर्थयात्रा ठीक आहेत, पण देशाची जनता महागाईच्या मुद्यावर होरपळून निघाली आहे. राज्यसभेत आम्हाला बोलू देत नाहीत. पण या प्रश्नी संसदेत वादळी चर्चा होईल. असा इशाराही संजय राऊत यांनी दिला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ”त्या’ विद्यार्थ्याला आत्महत्येस भाग पाडणाऱ्या खुनी सरकारवर ३०२ दाखल करा’
- ‘…चे श्रेय काशीचे खासदार असलेले पंतप्रधान मोदी यांनाच द्यावे लागेल’, शिवसेनेकडून मोदींचे कौतुक
- ‘ज्या गंगेच्या पात्रात मोदींनी डुबकी मारली त्याच गंगेत हजारो बेवारस प्रेते वाहताना जगाने पाहिले’
- ‘सचिन वाझे, मुकेश अंबानी अन मुख्यमंत्री’… काय म्हणाले राज ठाकरे..?
- 2 दिवस उशिरा का होईना पवार साहेबांना बड्डे गिफ्ट मिळालं; राणेंचा खोचक टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
