Share

गुणरत्न सदावर्तेंकडून मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख; न्यायालयात खेचण्याचा दिला इशारा

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा केला जातो. मात्र फक्त संभाजीनगर नव्हे तर छत्रपती संभाजीनगर असा उल्लेख करा; अन्यथा तुम्हाला कोर्टात खेचू. असा इशारा अॅड. गुणरत्न सदावर्ते(Adv. Gunratna Sadavarte) यांनी औरंगाबाद येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना (Udhav Thackrey) दिला. विशेष म्हणजे यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करत त्यांच्यावर टीकेची झोड उठवली. अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी औरंगाबाद येथील मध्यवर्ती बस स्थानकात संपास असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी संपात बसलेल्यांना या कष्टकऱ्यांना मी अभिवादन करतो म्हणत, आपला हा लढा जाती-धर्मावर नव्हे तर विचारांवर असल्याचे सांगत यापुढेही हा लढा असाच सुरू राहणार असल्याचे सांगितले.

एसटीचे राज्य शासनात विलीनीकरण यांसह इतर मागण्यांसाठी ७ नोव्हेंबरपासून कर्मचारी संपावर गेले आहेत. महिना उलटून गेल्यानंतरही हा संप अशाच प्रकारे सुरू असून आज (दि.१४) या पार्श्वभूमीवर अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी औरंगाबाद येथील संपकऱ्यांची भेट घेतली. यावेळी बोलतांना पुढे सदावर्ते म्हणाले, औरंगाबाद चे नाव संभाजीनगर असे बोलले जाते. मात्र जे लोक या एकेरी नावाने हाक मारत आहेत त्यांना मला सांगायचे आहे यानंतर जर कोणी संभाजीनगर असा एकेरी उल्लेख केला तर त्यांना न्यायालयात खेचण्यात येईल. छत्रपती संभाजी नगर, छत्रपती शिवाजी नगर अशाच प्रकारे या महापुरुषांच्या नावाचा उल्लेख व्हायला हवा. असा इशारा त्यांनी यावेळी दिला. तासगावात महिला कर्मचाऱ्यांना स्वच्छतागृह वापरण्यास बंदी घालण्यात आली होती. या गोष्टीचा मी निषेध व्यक्त करतो असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

विलीनीकरणाच्या विलंबास शरद पवारच जबाबदार

दिवाकर रावते(Diwakar Rawate) यांनी मेस्मा लावता येत नसल्याचे सांगितले असताना अनिल परब(Anil parab) मेस्मा लावण्याची भाषा करत आहेत. नेमके यात काय काळेबेरे आहेत. मी या सरकार आणि महामंडळाला सूताेवाच देताे जर एका नोटिसला महामंडळास पाच हजार खर्च येत असेल तर ९५ हजार कामगारांच्या नोटिसला किती असेल. या आंदोलनाचे खापर सदावर्ते यांनी शरद पवार यांच्यावर फोडत त्यांच्यामुळेच एसटीचे विलिनीकरण होण्यास विलंब होत असल्याचा आरोप केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!