🕒 1 min read
मुंबई : निवडणूक आयोगाने राज्यातील सहा जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता, त्यापैकी चार जागा बिनविरोध निवडून आल्या तर नागपूर आणि अकोला-वाशिम-बुलडाणा स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघामध्ये निवडणूक लागली होती. याची आज मतमोजणी झाली असून दोन्ही जागांवर भाजपाने दणदणीत विजय मिळवला आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा फटका बसला आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.
यासंदर्भात प्रविण दरेकर यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,’विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय!६ पैकी ४ जागी दमदार विजय मिळवत केला महाविकास आघाडीचा दारुण पराभव. या यशाबद्दल भाजपाच्या सर्व विजयी उमेदवारांचे व कार्यकर्त्यांचे हार्दिक अभिनंदन’, असे दरेकर म्हणाले आहेत.
"विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय!
६ पैकी ४ जागी दमदार विजय मिळवत केला महाविकास आघाडीचा दारुण पराभव.
या यशाबद्दल भाजपाच्या सर्व विजयी उमेदवारांचे व कार्यकर्त्यांचे हार्दिक अभिनंदन!"#MLCElectionResults2021 #BJP4Maharashtra pic.twitter.com/9JTohOD3z1— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) December 14, 2021
तसेच पुढे अजून एक ट्विट करत ते म्हणाले की,’राज्य सरकारचा कारभार चालवण्याची क्षमता महाविकास आघाडीमध्ये नसून ते अपयशी ठरलेत हे पुन्हा एकदा अकोला व नागपूर विधान परिषद निवडणुकीत जनतेने दाखवून दिले आले.भाजपवर टीका-टिप्पण्या करणाऱ्यांना चंद्रशेखर बावनकुळे व खंडेलवाल यांच्या विजयाने निश्चितच उत्तर मिळालेले आहेत.’
राज्य सरकारचा कारभार चालवण्याची क्षमता महाविकास आघाडीमध्ये नसून ते अपयशी ठरलेत हे पुन्हा एकदा अकोला व नागपूर विधान परिषद निवडणुकीत जनतेने दाखवून दिले आले.भाजपवर टीका-टिप्पण्या करणाऱ्यांना @cbawankule व खंडेलवाल यांच्या विजयाने निश्चितच उत्तर मिळालेले आहेत#MLCElectionResults2021 pic.twitter.com/JHMmNr5UiK
— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) December 14, 2021
दरम्यान, आज(१४ डिसें.)विधान परिषदेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये नागपूर मतदारसंघातून भाजपाचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी बाजी मारली असून अकोला-वाशिम-बुलडाणा मतदारसंघातुन भाजपचे वसंत खंडेलवाल हे विजयी झाले आहेत. नागपूरमध्ये भाजपचे बावनकुळे तर काँग्रेस समर्थित उमेदवार मंगेश देशमुख यांच्यात लढत झाली. ज्यामध्ये बावनकुळे यांना ३६२ मतं मिळाली तर देशमुख यांना १८६ मतं मिळाली. तर दुसरीकडे अकोला वाशिम बुलडाणा मतदारसंघात शिवसेनेचे गोपिकिशन बाजोरिया आणि भाजपचे वसंत खंडेलवाल यांच्यात लढत बघायला मिळाली. ज्यामध्ये वसंत खंडेलवाल यांना ३३८ तर शिवसेनेच्या गोपिकिशन बाजोरिया यांना ३२८ मतं मिळाली आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘विचारांची वीज कोसळावी तसे राहुल गांधींनी हिंदू राज्य आणण्याचा बार उडवला’
- …हा काँग्रेससारख्या ‘सेक्युलर’ पक्षासाठी चिंतनाचा विषय आहे- संजय राऊत
- ‘अल्पसंख्यांकांचे चोचले पुरवणे हेच काँग्रेसचे धोरण’
- ‘मराठी भाषेच्या अस्मितेसाठी लढणाऱ्या कोणत्याही मराठी सैनिकावर झालेला हल्ला खपवून घेणार नाही’
- ‘बूंद से गईं सो हौद से नही आती’, म्हाडाच्या भरती प्रक्रियेवरून भातखळकरांचा हल्लाबोल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
