Share

‘राज्य चालवण्याची क्षमता ‘मविआ’त नाही, हे या निवडणुकांवरुन दिसून आले’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नागपूर आणि अकोला-वाशिम-बुलडाणा निवडणुकींत भाजपाने महाविकास आघाडीचा दारुन पराभव केला. नागपूर मध्ये भाजपाचे चंद्रशेखर बावनकुळे तर अकोला वाशिम बुलडाणा येथे भाजपचे वंसत खंडेलवाल हे विजयी झाले आहेत. यावर भाजपाचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाना साधला आहे.

प्रविण दरेकर ट्विट करत म्हणाले, राज्य सरकारचा कारभार चालवण्याची क्षमता महाविकास आघाडीमध्ये नसून ते अपयशी ठरलेत हे पुन्हा एकदा अकोला व नागपूर विधान परिषद निवडणुकीत जनतेने दाखवून दिले आले. भाजपवर टीका-टिप्पण्या करणाऱ्यांना चंद्रशेखर बावनकुळे व खंडेलवाल यांच्या विजयाने निश्चितच उत्तर मिळालेले आहेत.

निवडणूक आयोगाने राज्यातील सहा जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता, त्यापैकी चार जागा बिनविरोध निवडून आल्या तर नागपूर आणि अकोला-वाशिम-बुलडाणा स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघामध्ये निवडणूक लागली होती. याची आज मतमोजणी झाली असून दोन्ही जागांवर भाजपाने दणदणीत विजय मिळवला आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा फटका बसला आहे.

अकोला वाशिम बुलडाणा मतदारसंघात शिवसेनेचे गोपिकिशन बाजोरिया आणि भाजपचे वसंत खंडेलवाल यांच्यात चुरशीची लढत झाली. या लढतीत भाजपचे वंसत खंडेलवाल हे विजयी झाले आहेत. वसंत खंडेलवाल यांना ३३८ तर शिवसेनेच्या गोपिकिशन बाजोरिया यांना ३२८ मतं मिळाली आहेत.

नागपूरमध्ये भाजपकडून चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी देण्यात आली होती. काँग्रेसला ऐनवेळी उमदेवार बदलावा लागला होता. छोटू भोयर यांच्या जागेवर अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना काँग्रेसने पाठिंबा दिला होता. आज या निवडणुकीची मतमोजणी पार पडली असून नागपूर विधान परिषदेच्या जागेवर भाजपाचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी बाजी मारली आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांना ३६२ मतं मिळाली. काँग्रेस समर्थित उमेदवार मंगेश देशमुख यांना १८६ मतं मिळाली. तर, छोटू भोयर यांना १ मत मिळालं आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी २७८ मतांचा कोटा पूर्ण केला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!