Share

नाव गांधीचे सांगायचे पण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना…- केशव उपाध्ये

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : म्हाडा भरतीची परिक्षा अचानक रद्द झाल्याने विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. तसेच म्हाडा भरती पेपर फुटी प्रकरणी आता राजकारण चांगलेच तापू लागले आहे. याच पार्श्वभूमीवर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड(Jitendra Awhad) यांच्या घराबाहेर निदर्शने केली. यावेळी पोलिसांनी आंदोलक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. अभाविपच्या या आंदोलनाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता.

याप्रकरणी आता भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये(Keshav Upadhye) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे. यासंदर्भात उपाध्ये यांनी ट्विट केले असून ते ट्विटमध्ये म्हणाले आहेत की,’राष्ट्रवादीचे नेते व महाराष्ट्रातील मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा बंगला आणि मारहाण हे समीकरण, ही नवी ओळख. नाव गांधीचे सांगायचे पण आंदोलन करणाऱ्या अभाविपच्या विद्यार्थ्यांना मारहाण करायची ही यांची ओळख’, असे उपाध्ये म्हणाले आहेत.

दरम्यान, पेपरफुटी प्रकरणी पुणे पोलिसांच्या सायबर विभागाला ६ आरोपींना पकडण्यात यश आले असून या आरोपींना न्यायालयामध्ये हजर केले असता या सर्व आरोपींना न्यायालयाने १८ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता(Amitabh Gupta) यांनी माहिती दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!