🕒 1 min read
मुंबई : म्हाडा भरती परीक्षेचा पेपर फोडण्याचा प्रयत्न झाल्यानंतर ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. याबाबत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी शनिवारी रात्री माहिती दिली. पेपर फोडण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पुण्यात तिघांना अटक झाली आहे. यावर भाजपाचे माळशिरस विधानसभेचे आमदार राम सातपुते यांनी जितेंद्र आव्हाडांसह महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.
याबाबत राम सातपुते यांनी ट्विट केले असून ते म्हणाले आहेत की, ‘सरकारने पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांच वाटोळं करायचा संकल्प केला दिसतोय. आज होणारी म्हाडाची परीक्षा पुढे ढकलली. विद्यार्थ्यांचा किती तळतळाट घेणार हे सरकार. विद्यार्थी रेल्वे स्टेशनला जाऊन झोपले आहेत, कोणी बस, रेल्वे प्रवासात आहेत आणि परीक्षा रद्द.’
सरकारने पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांच वाटोळं करायचा संकल्प केला दिसतोय.आज होणारी म्हाडा ची परीक्षा पुढे ढकलली.विद्यार्थ्यांचा किती तळतळाट घेणार हे सरकार.विद्यार्थी रेल्वे स्टेशन ला जाऊन झोपले आहेत,कोणी बस,रेल्वे प्रवासात आहेत आणि परीक्षा रद्द..????@Dev_Fadnavis pic.twitter.com/ZeSwFupTmZ
— Ram Satpute (@RamVSatpute) December 12, 2021
जितेंद्र आव्हाड ट्विटमध्ये म्हणाले आहेत की, म्हाडाच्या परीक्षांच्या संदर्भात काही जणांनी मध्यस्थांना पैसे दिल्याचे माझ्या कानावर आले आहे. तुम्ही ज्याही कोणत्या व्यक्तीला पैसे दिले असतील तर ते हक्काने परत घ्या. म्हाडाच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनो तुमचा अधिकार, तुमच्या बुद्धीचा सन्मान करत पैशाने तो मारला जाईल असं मी कधीच होऊ देणार नाही. माझ्याकडे आलेल्या तक्रारीमध्ये काही जणांनी आपली जमीन विकली आहे.
आपल्या घरातले दागिने विकले आहेत. काही जणांनी कर्ज काढले आहेत. माझी या दलालांना नम्र विनंती आहे की हे पैसे परत करा. कारण तुम्ही त्यांचे काम करू शकणार नाही आणि मी ते होऊ देणार नाही. पण असे ज्यांनी आपल्या आईचे मंगळसूत्र गहाण ठेवले आहे, आपली शेती गहाण ठेवली आहे असे पैसे घेऊन तुमची मूल-बाळ कधीच सुखी होऊ शकणार नाहीत.
दरम्यान,‘सर्व विद्यार्थ्यांची क्षमा मागून काही अपरिहार्य कारणामुळं आणि तांत्रिक अडचणीमुळं म्हाडाची आज होणारी परीक्षा आणि यापुढे होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. या परीक्षा जानेवारी महिन्यात होतील. ही माहिती एवढ्या रात्री यासाठी देतोय की विद्यार्थ्यांनी सेंटरवर जाऊ नये, त्यांना त्रास होऊ नये. परत एकदा क्षमा मागतो’,असेही आव्हाड म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- …तेव्हा राज्यकर्त्यांच्या मानसिकतेची दया आली- संजय राऊत
- महाराष्ट्र आणि बंगालमध्ये ‘ईडी’,’सीबीआय’सारख्या यंत्रणा करतात भाजपासाठी काम
- कॅ.अमरिंदर यांना बदलले नसते तर पंजाबमध्ये काँग्रेस संपली असती- राहुल गांधी
- आज होणारी म्हाडाची परीक्षा ढकलली पुढे; मध्यरात्री ट्विट करत जितेंद्र आव्हाडांनी दिली माहिती
- एमआयएमची ‘तिरंगा रॅली’ मुंबई वेशीवरच रोखणार; पोलिसांचा कडक बंदोबस्त
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
