Share

…तेव्हा राज्यकर्त्यांच्या मानसिकतेची दया आली- संजय राऊत

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : काही दिवसांपूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी(Rahul Gandhi) आणि काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी(Priyanka Gandhi) यांची भेट घेतली. दरम्यान, या भेटीचा सविस्तर सार राऊतांनी आजच्या आपल्या सामना रोखठोकमधून मांडला आहे.

लेखात राऊत म्हणाले आहेत की, काँग्रेसचे माजी अध्यक्ष व आजच्या काँग्रेसचे सर्वेसर्वा राहुल गांधी यांना दिल्लीतील त्यांच्या तुघलक लेन या निवासस्थानी भेटलो. राहुल यांच्या नेतृत्वाविषयी आज सगळ्यात जास्त भ्रम आणि संशय निर्माण केला जात आहे. देशातील विरोधी पक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली एकवटायला तयार नाही. त्यामुळे मोदी व त्यांच्या पक्षाला रान मोकळे आहे, असे चित्र निर्माण केले जात आहे. ते तितकेसे खरे नाही. ममता बॅनर्जी यांनी ‘यूपीए’च्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण केले. विरोधी पक्षांच्या आघाडीचा नवा घोडा घेऊन प. बंगालच्या मुख्यमंत्री २०१४ मध्ये मैदानात उतरत आहेत. त्यांना काँग्रेसशिवाय नवी आघाडी हवी आहे. मंगळवारच्या भेटीत राहुल गांधी यांच्याशी या विषयावर चर्चा झाली. ‘ममता बॅनर्जींच्या मनात नेमके काय आहे? त्यांना काय हवे आहे?’ हा प्रश्न त्यांच्याही मनात होताच.

दरम्यान, राहुल गांधींना मंगळवारी तर सध्या उत्तर प्रदेशात जागोजागी मोठी गर्दी जमत असलेल्या त्यांच्या भगिनी प्रियंका गांधी यांना बुधवारी(१० डिसें.)जनपथ या सोनिया गांधींच्या निवासस्थानी भेटलो. ‘तुम्ही सध्या इथेच राहता?’ यावर प्रियंका म्हणाल्या, ‘सध्याच्या मोदी सरकारने मला घरातून बाहेर काढल्यापासून मी खान मार्केटजवळच्या एका इमारतीत राहते, पण लोकांना तेथे भेटता येत नाही. त्यामुळे येथे येऊन भेटीगाठी घेते.’ इंदिरा गांधींची नात, पंडित नेहरूंची पणती, राजीव गांधींची कन्या मला हे सर्व सांगत होती. तेव्हा राज्यकर्त्यांच्या मानसिकतेची दया आली. जिची आजी आणि पिता अतिरेक्यांच्या हल्ल्यात मारले गेले त्या कन्येस सुरक्षेच्या कारणास्तव एक सरकारी घर भाजप सरकार देऊ शकले नाही. उलट राहत्या घरातून बाहेर काढले. आज दिल्लीत अनेक सरकारी घरे ‘गेस्ट अकॉमोडेशन’च्या नावाखाली कोणी व कोणत्या संघटनांच्या लोकांनी बळकावली आहेत हे पाहिल्यावर प्रियंका गांधींची वेदना लक्षात येईल’, असेही राऊत म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!