Share

एमआयएमची ‘तिरंगा रॅली’ मुंबई वेशीवरच रोखणार; पोलिसांचा कडक बंदोबस्त

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील आणि एमएमआयचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी हे मुंबईत तिरंगा रॅली काढणार आहेत. मात्र, मुंबईत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. असे असतानाही शहरामध्ये रॅली काढण्याचा निर्धार इम्तियाज जलील यांनी केला आहे. त्यानुसार राज्यातून त्यांचे अनेक कार्यकर्ते मुंबईकडे निघाले आहेत.

मुंबई पोलिसांनी जमावबंदीचे आदेश लागू केल्यानंतर कार्यकर्त्यांना मुंबईच्या सीमेबाहेर रोखण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, तिरंगा रॅलीसाठी धुळ्याहून मुंबईला निघालेल्या एमआयएम कार्यकर्त्यांना पोलिसांनी मालेगावत स्थानबद्ध केले आहे.

मुंबईच्या दिशेने औरंगाबादहून एमआयएमचे कार्यकर्ते गाड्या घेऊन रवाना झाले आहेत. मुस्लीम आरक्षण आणि वक्फ मालमत्तेचे रक्षण व्हावे अशी एमआयएमची मागणी आहे. खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली एमआयएमकडून मुंबईच्या दिशेने गाड्यांची मोठी रॅली निघाली आहे. अहमदनगर येथे शहरात प्रवेश न करता शहराबाहेर असलेल्या शेंडी बाह्यवळण रस्त्यावरून शहराबाहेर जात ही रॅली पुण्याच्या दिशेने पुढे निघाली आहे.

मुंबईत रॅलीला परवानगी नाकारली असून, जमावबंदी लावण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईच्या मुलुंड चेकनाक्यावर पोलीसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच नवी मुंबईतील वाशी टोल नाक्यावर आणि मानखुर्द येथे कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!