🕒 1 min read
मुंबई : दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) ही गेल्या काही दिवसांपासून वैयक्तिक गोष्टींमुळे चर्चेत आहे. एकीकडे नागा चैतन्यचे (Naga Chaitanya’) अफेअर असल्यामुळे तिने घटस्फोट (divorce) घेतल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. तर दुसरीकडे समांथाला मुल नको असल्यामुळे त्यांचा घटस्फोट झाल्याचे म्हटले जाते. मात्र त्यांच्या घटस्फोटाचे खरे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. ‘आता बस्स! असं म्हणत नुकतंच समांथाने घटस्फोटावर विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांवर प्रतिक्रिया दिली असून आगामी काळात चांगल्या ऑफर आल्याचं ही स्पष्ट केले आहे.
दरम्यान साऊथ इंडस्ट्रीमध्ये तिला चांगल्या ऑफर्स येत असल्याचं सांगून या प्रोजेक्टकरीता मेहनत घेत असल्याचं ही तिने सांगितले आहे. तसेच समांथाने एका मुलाखतीमध्ये तिला तिच्या खासगी आयुष्यावर सतत प्रश्न विचारले जात असल्याचे म्हटले. त्यावर उत्तर देत ती म्हणाली, ‘मला वाटतंय आता पुरे झालं यावर बोलणं. ते महत्त्वाचे होते म्हणून मी बोलले पण मला नाही वाटत यावर सतत बोलायचं हवं.’ पुढे ती म्हणाली, ‘मी खूप मेहनत घेऊन काम करत आहे. माझं नशीब चांगलं असल्यामुळे मला अनेक चांगल्या भूमिकांच्या ऑफर आल्या आहेत. मी फक्त आशा करते आणि देवाकडे प्रार्थना करते की मला अशा अनेक भूमिकांच्या ऑफर येत राहू देत.’ यामुळे चाहते देखील तिचे स्वागत करत आहेत.
https://www.instagram.com/p/CXQ4WtcBkkc/?utm_source=ig_web_copy_link
समांथा लवकरच तेलुगू चित्रपट शकुंतलम (Telugu film Shakuntalam) आणि तमिळ चित्रपट काठू वकालु रेंदु कधालमध्ये दिसणार आहे. या चित्रपटाच समांथा रुथ प्रभू सुपरस्टार विजय सेतुपतीसोबत दिसणार आहे. तसेच ती राज एण्ड डीके यांच्या आगामी प्रोजेक्टमध्ये दिसणार असल्याचे म्हटले जात आहे. एका वेब सीरिजचे समांथा चित्रीकरण सुरु करणार असल्याचे म्हटले जात असून चाहत्यांमध्ये उत्सुकता पहायला मिळत आहे.
महत्वाच्या बातम्या:
- ‘शरद पवारांच्या विचारांना भगवं कव्हर घातलं, अवघा रंग एक झाला’
- शरद पवारांनी सांगितला नावं लक्षात ठेवयाचा भन्नाट किस्सा, म्हणाले…
- …ही महाराष्ट्र काँग्रेसच्या इतिहासातील सर्वात वाईट घटना- चंद्रशेखर बावनकुळे
- ‘हे बाळ त्याचं नाही तर…’ ; कॉमेडियन भारती सिंहने केला खुलासा
- ‘भारत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिका सहज जिंकेल’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
