Share

सुधीर भोंगळेंनी सांगितला ‘तो’ किस्सा जेव्हा शरद पवारांनी इतक्या जोरात टेम्पो चालवला की…

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा आणि ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. शरद पवार यांचा उद्या १२ डिसेंबर रोजी वाढदिवस आहे. या पार्श्वभूमीवर पवारांच्या मोजक्या भाषणांचा संग्रह असलेले पुस्तक ‘नेमकचि बोलणे’ या पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम पार पडला. हे पुस्तक पत्रकार सुधीर भोंगळे यांनी लिहले आहे. यावेळी सुधीर भोंगळे (Sudhir Bhongle) यांनी शरद पवारांचा एक भन्नाट किस्सा सांगितला.

सुधीर भोंगळेंनी सांगितलं की, एक दिवस पेरणे वाल्हे गोलाई परिसरात गारपीट झाली. तिथं मोठं नुकसान झालं होतं. त्यावेळी सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) हे अर्थमंत्री होते आणि शरद पवार तेव्हा विरोधी पक्ष नेते होते. नुकसानबाधितांना कमी मदत मिळाल्यामुळं त्यांना पवारांनी फोन लावला आणि म्हटलं गरीबांची चेष्टा काय करताय, शेळी मेली तर शंभर रुपए नुकसान भरपाई देताय. किमान हजार, दोन हजार तरी मदत करायची ना, असं पवारांनी शिंदे यांना सांगितलं होतं, असं भोंगळे यांनी सांगितलं.

पुढे बोलताना सुधीर भोंगळे म्हणाले, आम्ही घटना घडलेल्या ठिकाणी निघालो. तिथं काही कारणानं पवारांची गाडी जात नव्हती. मग एक 16 सीटरचा टेम्पो होता. तो जात होता. मग आम्ही त्या टेम्पोनं जायचं ठरवलं. स्वत: शरद पवारांनी टेम्पो चालवायला घेतला. मला म्हणाले पुढं बस माझ्यासोबत. इतक्या जोरात पवार साहेब टेम्पो चालवत होते की धडाधड टेम्पो उडत होता. आणि आमचं डोकं टपाला आदळत होतं. मी पवार साहेबांना म्हटलं की, अहो गाडी चालवताय का विमान चालवताय. तर ते म्हणाले की, पवारांना असल्या गाड्या हळू हळू चालवायला जमतच नाही. हा किस्सा ऐकत असताना शरद पवार यांनी देखील हसून दाद दिली.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!