🕒 1 min read
नवी दिल्ली : आयपीएल (ipl) च्या नव्या हंगामाच्या लिलावापूर्वी आरसीबीने कायम ठेवलेल्या तीन खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत. आरसीबीने युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आणि हर्षल पटेल (Harshal Patel) अशी मोठी नावे संघातून वगळली आहेत. तीन खेळाडूंपैकी एका परदेशी खेळाडूचा समावेश करण्यात आला आहे. आरसीबी (Royal Challengers Bangalore) ने स्टार स्पोर्ट्सवर त्यांच्या तीन नावांची घोषणा केली.
माजी कर्णधार विराट कोहलीला आरसीबीने १५ कोटी रुपयांमध्ये कायम ठेवले आहे. त्याच्याशिवाय ग्लेन मॅक्सवेलला 11 कोटी आणि मोहम्मद सिराजला 7 कोटींमध्ये कायम ठेवण्यात आले आहे. चौथ्या खेळाडूचा पर्यायही आरसीबीकडे होता पण त्यांनी फक्त तीन नावांचा समावेश करण्याचा निर्णय घेतला.
आरसीबीने कायम ठेवल्यानंतर विराट कोहली म्हणाला की, ‘मी पुन्हा आरसीबीचा भाग झालो. मला आनंद आहे. मी अनेक वर्षे या संघाचे नेतृत्व केले आहे. त्याचा एक भाग असल्याचा अभिमान वाटतो. तसेच कोहलीने कायम ठेवल्याबद्दल संघाचे आभार मानले आहेत. मी मनापासून संघासोबत असेन, असे कोहली म्हणाला.
RCB Player Retention Announcement: Virat Kohli, Glenn Maxwell and Mohammed Siraj are retained for the Vivo IPL 2022 season. #PlayBold #WeAreChallengers #IPLRetentions pic.twitter.com/NMKMyd24xb
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) November 30, 2021
विराट कोहलीने गेल्या आयपीएलमध्ये आरसीबीचे कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली होती. आयपीएलच्या दुसऱ्या पर्वापूर्वी कोहलीने ही घोषणा केली होती. याचाच अर्थ कोहली आता दुसऱ्या खेळाडूच्या नेतृत्वाखाली खेळताना दिसणार आहे. कोणाला कर्णधार बनवणार हे पाहणे बाकी आहे. याबाबत नंतर गोष्टी स्पष्ट होतील. सध्या लिलाव प्रक्रियेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘हजारो लोक रस्त्यावर गुपचूप येऊ शकतच नाही, पोलिसांना सूचना दिली होती हे होऊ द्या’
- कॉमेडीयन मुनावर फारुकीच्या पाठीशी कॉंग्रेस उभी
- देशात आत्तापर्यंत ओमायक्रॉनचा एकही रुग्ण नाही; केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दिली दिलासादायक माहिती
- ‘२ नंबरी महाविकास आघाडी सरकारची ही काळी कमाई’, चित्रा वाघ यांचे टीकास्त्र
- ‘महाराष्ट्राची प्रकृती बिघडली, राज्याला पूर्वपदावर आणण्यासाठी ऑपरेशनची गरज’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
