🕒 1 min read
मुंबई : रविवारी औरंगाबाद येथील एमजीएम महाविद्यालयात जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांच्यासह नेत्यांचा सत्कार सोहळा झाला. यात एकाही मंत्र्याने मास्क परिधान केले नाही तसेच कोरोना प्रतिबंधक नियमांचीही पायमल्ली झाली. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. यावर भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी टीका केली आहे.
भातखळकर याप्रकरणी ट्विट करत म्हणाले, रविवारी औरंगाबादेत झालेल्या जाहीर कार्यक्रमात आरोग्यमंत्र्यांसह ५ मंत्र्यांच्या उपस्थितीत कोरोनाचे सर्व नियम पायदळी तुडवण्यात आले. राज्यातले मंत्री, प्रवक्ते हेच कोरोनाचे सर्व शासकीय नियम पायदळी तुडवत आहेत आणि सर्वसामान्य जनतेला मात्र त्यासाठी आर्थिक दंडाची शिक्षा केली जाते. अशी टीका अतुल भातखळकरांनी केली आहे.
रविवारी औरंगाबादेत झालेल्या जाहीर कार्यक्रमात आरोग्यमंत्र्यांसह ५ मंत्र्यांच्या उपस्थितीत कोरोनाचे सर्व नियम पायदळी तुडवण्यात आले.
राज्यातले मंत्री, प्रवक्ते हेच कोरोनाचे सर्व शासकीय नियम पायदळी तुडवत आहेत आणि सर्वसामान्य जनतेला मात्र त्यासाठी आर्थिक दंडाची शिक्षा केली जाते. pic.twitter.com/MjmJ24ErFf— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) November 30, 2021
या कार्यक्रमाला सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे, (Dhnanjay Munde) रोजगार कृषी आणि फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे, (Sandipan Bhumre) राज्यमंत्री अब्दुल सत्तार (Abdul sattar) यांच्यासह आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) उपस्थित होते. येथे एकही मंत्र्यांने मास्क घातले नसल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे औरंगाबाद बहुजन विकास आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी सुनील चव्हाण (DM Sunil Chavan) यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ट्विटरच्या प्रमुखपदी पराग अग्रवाल: एलॉन मस्कने केले कौतुक,म्हणाले..
- शिवसेनेने मुख्यमंत्रीपदासाठी आपलाच पक्ष संपवला- चंद्रकांत पाटील
- शशी थरूर यांच्या ‘त्या’ ट्वीटचा मिमी चक्रवर्तींकडून बचाव; म्हणाल्या..
- …या साथीची उत्पत्ती भारतात झाल्याचा आम्हाला अभिमान आहे- आनंद महिंद्रा
- ‘…याचा मला पश्चात्ताप आहे’, अजित पवारांसोबतच्या ‘त्या’ शपथविधीविषयी फडणवीसांचे वक्तव्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
