Share

नाशिकमध्ये भाजप मंडळ अध्यक्षाची निघृण हत्या

Published On: 

🕒 1 min read

नाशिक : नाशिक शहरात (nashik) गुन्हेगारीचं प्रमाण काही केल्या कमी होताना दिसत नाही. शहरात घडलेल्या हत्येच्या घटनेनं नाशिक शहर पुन्हा हादरलं आहे. सातपूर परिसरातील भाजप मंडळ अध्यक्ष अमोल इघे यांची निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. राजकीय पूर्ववैमनस्यातून हत्या झाली असल्याचा संशय व्यक्त करण्यात येतो आहे.

सातपूर परिसरातील भाजप मंडळ अध्यक्ष अमोल इघे यांची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. राजकीय पूर्ववैमनस्यातून हत्या झाली असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. नाशिक शहर हत्येच्या घटनेनं हादरल असून अवघ्या चार दिवसात नाशिकमधील ही तिसरी हत्येची घटना आहे.

अवघ्या 4 दिवसात नाशिकमधील तिसरी हत्या असल्याचं सांगण्यात येत आहे. या प्रकाराने परिसरात खळबळ माजली आहे. तसेच शहरातील पोलिसांच्या गस्ती बाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. काही दिवसांपूर्वी एका तरुणाची दगडाने ठेचून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. किरकोळ वादातून ही हत्या झाली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला.

नाशिकमधील म्हसरूळ आरटीओ ऑफिसजवळ (Mhasrul RTO office Nashik) ही हत्या झाली होती. तर ऐन दिवाळीत एका महिलेची चाकूने वार (knife attack) करुन हत्या केल्याची घटना नाशकात समोर आली होती. मृतक महिलेचे नाव पूजा आंबेकप (Pooja Ambekar) असे होते. पूजा आंबेकर ही आरपीआयची महिला पदाधिकारी होती. 3 नोव्हेंबर रोजी रात्रीच्या सुमारास पूजाची हत्या करण्यात आली होती.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!