🕒 1 min read
मुंबई : विधानसभा निवडणूकीनंतर राज्यात वेगाने राजकीय हालचाली सुरु होत्या. विरोधा पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भल्या पहाटे शपथविधी घेत सरकार स्थापन केलं. मात्र ते सरकार 80 तासांतच कोसळलं. या पहाटेच्या शपथविधीला आज बरोबर 2 वर्षे पूर्ण झाली. आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अनेकदा महाविकास आघाडी सरकार कोसळणार आणि भाजपचं सरकार स्थापन होणार असल्याचं वक्तव्य केलं आहे. तर त्यांच्या या वक्तव्याला आता शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी चंद्रकांत पाटलांना जोरदार टोला लगावला आहे.
संजय राऊत यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad pawar) यांची यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये भेट घेतली. त्यानंतर संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटलांना खोचक सल्ला दिला आहे. ‘नवीन वर्षात हे सरकार जाणार आहे आणि गुढीपाडव्यापर्यंत नव्या सरकारची मुहूर्तमेढ रोवली जाईल, असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते.
‘चंद्रकांत पाटील यांनी आतापर्यंत 28 वेळा असं वक्तव्य केलं आहे की, हे सरकार जाईल. त्याची माझ्याकडे नोंद आहे. त्यांना बोलत राहू द्या. चंद्रकांत पाटील हे भाजपचे राज्याचे अध्यक्ष आहेत. त्यांनी असं बोलणं गरजेचं आहे. त्यांच्या अशा बोलण्याचं काही हे सरकार जात नाही हे सगळ्यांना माहिती आहे. हे सरकार पुढील 25 वर्षे टिकेल आणि या सरकारचं ‘पॉवर सेंटर’ जिथे आहे तिथे मी आता उभा आहे, असं संजय राऊतांनी सांगितलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- चंद्रकांत पाटलांच्या सत्ताबदलाच्या वक्तव्यावरुन संजय राऊतांचा खोचक सल्ला; म्हणाले, आधी…
- रुपाली पाटील मनसे सोडणार?, बेधडक वक्तव्याने चर्चांना उधाण
- कट कारस्थानं झाली नसती तर आज निकाल वेगळा असता- शशिकांत शिंदे
- पत्नीला दिलेली प्रेमाची अनोखी निशानी, ज्याने पाहिले तो म्हणाला- ‘वाह ताज’!
- शरद पवारांसोबत झालेल्या बैठकीनंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया; म्हणाले,’एसटी संपाबाबत लवकरच…’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
