Share

ओबीसी आरक्षणावरून पंकजा मुंडेंची ठाकरे सरकारवर टीका

Published On: 

🕒 1 min read

मुंबई:  ओबीसी आरक्षणासंदर्भात (OBC Reservation) इम्पॅरिकल डेटावरून केंद्र आणि राज्यातली लढाई आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. यावरून राज्य सरकावर मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे. यानंतर आता भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी मंगळवारी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

पंकजा म्हणाल्या की, आयोग स्थापन केले पण निधी दिला नाही. सातवेळा तारखा वाढवून मागितल्या. या सरकारला असुरक्षित करायचं आहे की काय, आरक्षण संपुष्टात आणायचं की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. आंदोलनानंतर ओबीसी आरक्षणासाठी अध्यादेश काढून आरक्षणाला संरक्षण देण्याचं ढोंग घेतलं. या अध्यादेशाविरोधात लोक औरंगाबाद खंडपीठात गेले आहेत. ओबीसी आणि बहुजनांना अंधारात लोटणारा निर्णय या सरकारच्या काळात असल्याचे देखील पंकजा मुंडे म्हणाल्या.

पुढे पंकजा मुंडे म्हणाल्या की, आरक्षण मिळण्यासाठी इम्पिरिकल डेटावर काम झालं पाहिजे. आयोगाला निधी द्यावा, मंत्र्यांना पाठिशी घालण्यासाठी निधी आहे. पण आयोगासाठी निधी नाही हे दुर्दैव आहे. यावेळी निधी देण्याची मागणी त्यांनी केली आहे. या आयोगाला पूर्वीच निधी दिला असता तर ही वेळ आली नसती, असे म्हणत त्यांनी खेद व्यक्त केला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!