🕒 1 min read
मुंबई : एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याच्या प्रमुख मागणीसाठी एसटी कर्मचारी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करत आहेत. एसटी कर्मचारी संपावर असताना त्यांच्या आंदोलनाला भाजपने जाहीर पाठिंबा दिला आहे. राज्यभरात हा विषय चर्चेचा ठरला आहे. यावर गोपीचंद पडळकर यांनी टीका केली आहे.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (Pravin Darekar), भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar), रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी मुंबईतील आझाद मैदानावर एसटी कर्मचाऱ्यांसोबत महाविकास आघाडी विरोधात मोठे आंदोलन छेडले आहे.
४५ मराठी एसटी कर्मचाऱ्यांनी जीव गमवला अशात त्यांच्याविरोधात दंड थोपटणे म्हणजे पुरूषार्थ नाही. स्व.बाळासाहेबांनी #शिवसेनेची स्थापना ९०%समाजकारण आणि १०% राजकारणासाठी केली होती.उद्धवसेना सत्ता लाचारीसाठी १००% राजकारण करतंय.आता जनाब @rautsanjay61 यांचं कौतुक करतील.@SaamanaOnline pic.twitter.com/PmcSIMu6fM
— Gopichand Padalkar (@GopichandP_MLA) November 22, 2021
पडळकर ट्विट करत म्हणाले, ४५ मराठी एसटी कर्मचाऱ्यांनी जीव गमवला अशात त्यांच्याविरोधात दंड थोपटणे म्हणजे पुरूषार्थ नाही. स्व.बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना ९०% समाजकारण आणि १०% राजकारणासाठी केली होती. उद्धवसेना सत्ता लाचारीसाठी १००% राजकारण करतंय. आता जनाब संजय राऊत यांच कौतुक करतील. अशी टीका पडळकरांनी केली आहे.
दरम्यान, काल मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलनासाठी येणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना पोलिसांनी आडवले होते. त्यावर भाजप नेते आक्रमक झाले आहेत. काल एसटी कर्मचाऱ्यांनी परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांना खणानारळासह साडीचोळी पाठवली आहे. या संपावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने एक समिती देखील नेमली, मात्र या समितीवर एसटी संघटनांनी आक्षेप नोंदवला असून तत्काळ विलीनीकरण करावे या मागणीवर कर्मचारी ठाम आहेत.
महत्वाच्या बातम्या
- समीर वानखेडेंच्या विवाहाचा दाखला ट्विट करत, नवाब मलिकांच्या मुलीचा नवा दावा
- भाजपाने आतातरी हुकूमशाही बंद करावी- बाळासाहेब थोरात
- गेहलोत मंत्रिमंडळात फेरबदल; १५ मंत्री घेणार शपथ
- कोणाच्या अंगी देव येतो, निघून जातो, पण बाबासाहेबांच्या अंगी…- संजय राऊत
- मुख्यमंत्र्यांची घोषणा; आंदोलनादरम्यान बलिदान देणाऱ्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना करणार मोठी मदत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
