Share

मुख्यमंत्र्यांची घोषणा; आंदोलनादरम्यान बलिदान देणाऱ्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना करणार मोठी मदत

Published On: 

🕒 1 min read

हैदराबाद : शुक्रवारी(१९ नोव्हें.)पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केल्यानंतर, शनिवारी(२० नोव्हें.)सायंकाळी हैदराबाद येथे एका पत्रकार परिषदेला संबोधित करताना तेलंगणा राष्ट्र समिती (टीआरएस) पक्षाचे प्रमुख आणि मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव(Telangana CM K Chandrashekhar Rao) यांनी शेतकरी आंदोलनादरम्यान बलिदान देणाऱ्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी तीन लाख रुपयांची मदत जाहीर केली. फक्त एवढेच नाही तर या आंदोलनातील पीडित शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २५ लाख रुपयांची मदत केंद्र सरकारने जाहीर करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

यावेळी राव म्हणाले की, ‘तेलंगणा सरकारने या मानवतावादी कार्यासाठी २२ कोटी रुपये दिले आहेत आणि शेतकरी आंदोलनाच्या नेत्यांना आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांची माहिती पाठवण्याची विनंती केली. कृषी कायदा विरोधी आंदोलनात ७०० हून अधिक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे.’

दरम्यान, तीन वादग्रस्त कृषी कायदे मागे घेतल्याच्या घोषणेनंतर शेतकऱ्यांचे अभिनंदन करताना राव यांनी केंद्र सरकारने शेतकरी आंदोलनात शेतकऱ्यांना पाठिंबा देणाऱ्या शेतकऱ्यांवर दाखल झालेले सर्व गुन्हे मागे घेण्यात यावे. तसेच देशातील शेतकऱ्यांच्या हितासाठी येत्या संसदेच्या अधिवेशनात किमान आधारभूत किमतीबाबत विधेयक आणि कायदा आणण्याची आणि भारतीय अन्न महामंडळातर्फे वार्षिक खरेदी धोरण अगोदर लागू करण्याची मागणीही राव यांनी यावेळी केली आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!