Share

‘त्याला माझ्या कमतरता माहीत आहेत’, रोहितने केले न्यूझीलंडच्या ‘या’ खेळाडूचे कौतुक

Published On: 

🕒 1 min read

जयपूर: पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात भारताने न्यूझीलंडवर पाच गडी राखून मात केली. सूर्यकुमार यादवने ४० चेंडूंत ६२ धावा आणि कर्णधार रोहित शर्माने (३६ चेंडूंत ४८ धावा) यांच्या फलंदाजीच्या जोरावर भारताने पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात न्यूझीलंडवर आघाडी मिळविली. तसेच रोहित शर्मा आणि राहुल द्रविड या कर्णधार-प्रशिक्षकाच्या नव्या पर्वाचाही विजयी प्रारंभ झाला.

कर्णधार म्हणून रोहित शर्माने भारताला उत्तम सुरुवात मिळवून दिली.अर्धशतकाच्या जवळ पोहोचल्यानंतर न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने त्याला बाद केले. दरम्यान सामना झाल्यावर रोहितने पत्रकार परिषदेत न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्टचे कौतुक केले आहे. बोल्टने त्याला ४८ धावांवर रचिन रवींद्रकरवी झेलबाद केले.

आम्ही मुंबई इंडियन्ससाठी खूप क्रिकेट खेळलो आहोत. बोल्टला माझ्या कमकुवत बाजू माहीत आहेत आणि मला त्याची ताकद माहीत आहे, दोघांमध्ये चांगली लढत झाली. जेव्हा मी त्याचा कॅप्टन असतो, तेव्हा मी त्याला नेहमी ‘ब्लफ’ करायला सांगतो आणि त्याने तेच केले. त्याने मिड-विकेटचा खेळाडू मागे ठेवला आणि फाइन लेग वर ठेवला आणि मला माहीत होते की तो बाउन्सर टाकणार आहे. मी चेंडू क्षेत्ररक्षकावरून मारण्याचा प्रयत्न करत होतो, पण दुर्दैवाने चेंडूला जास्त वेग नव्हता.

सामन्याबाबतही रोहितने आपली प्रतिक्रिया दिली आहे. विजय सोपा नव्हता, युवा खेळाडूंना खूप शिकण्यासारखे होते कारण त्यांनी भारतासाठी यापूर्वी अशा परिस्थितीत फलंदाजी केलेली नव्हती. काय करावे लागेल हे समजून घेणे त्यांच्यासाठी खूप चांगले शिक्षण होते. एक संघ म्हणून आम्ही आनंदी आहोत की त्यांनी अशा परिस्थितीत फलंदाजी केली आणि सामना संपवला. तांत्रिकदृष्ट्या एक चांगला खेळ होता, काही खेळाडूंची उणीव होती आणि नवीन खेळाडूंकडे क्षमतेनुसार काय आहे ते पाहता आले. आमच्या सर्व गोलंदाजांनी खूप प्रयत्न केले. अश्विन आणि अक्षर दिल्ली कॅपिटल्ससाठी एकत्रितपणे गोलंदाजी करतात आणि ते नेहमी विकेट घेण्याचा विचार करतात. सूर्याने शानदार फलंदाजी केली.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!